Korpana : घरगुती गॅसचा (14.2KG)व्यवसायसाठी वापर करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.हॉटेल,रेस्टॉरंट,चहाच्या टपऱ्या,ढाबे किंवा कोणत्याही व्यावसायिक ठिकाणी व्यावसायिक (19,47. Kg)सिलिंडर वापरणे बंधनकारक आहे.घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर केल्यास गॅस सिलिंडर नियमांतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाते.याच पार्श्वभूमीवर कोरपना तालुका अन्नपुरवठा विभागाने तालुक्यातील गडचांदूर व कोरपना शहरातील हॉटेल,बार,ढाबे,चहाच्या टपऱ्या,चिकन सेंटरसह इतर व्यावसायिक आस्थापनांवर धाड टाकून तब्बल 33 घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.सदर कारवाईमुळे तालुक्यामध्ये घरगुती सिलिंडरचा गैरवापर करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून कोरपना,गडचांदूर शहरातील विविध भागांतून अनुदानित घरगुती सिलिंडरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी अन्नपुरवठा विभागाकडे होत होत्या. शासनाच्या अनुदानाचा गैरफायदा घेत व्यावसायिक वापर करून महसूल बुडवला जात असल्याने,निरीक्षण अधिकारी व त्यांच्या पथकाने कोणतीही पुर्वसुचना न देता अचानकपणे छापे टाकत व्यापक तपासणी मोहीम राबवत शहरातील प्रमुख बाजारपेठ, वर्दळीचे चौक,हॉटेल पट्टा व इतर भागात तपासणी करून अनेक नामांकित हॉटेल्स,बार,ढाबे,चहाच्या टपऱ्या व चिकन सेंटरमधून घरगुती वापराचे 33 सिलिंडर जप्त केले आहे.व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेले निळ्या रंगाचे कमर्शिअल सिलिंडर टाळून,अनुदानित घरगुती सिलिंडर वापरून आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचे उघड झाले.
'प्रशासनाचा स्पष्ट इशारा'
'घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणे हा गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या गॅस पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होतो.अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रपणे,सातत्याने आणि कठोरपणे राबवली जाईल.अशी माहिती कोरपना तालुका अन्नपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.
#Gas Cylinder Misuse.#Illegal use Gas Cylinder.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
