Gadchandur : सध्या गडचांदुरकर स्थानिक माणिकगड (अल्ट्राटेक)सिमेंट कंपनी प्रशासनाच्या अरेरावी आणि खोटारडेपणाला अक्षरशः कंटाळले असून ओला कचरा आणणे बंद केले म्हणत काही दिवसांच्या अल्पविरामानंतर पुन्हा दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या गाड्या कंपनीत आणल्या जात आहे. आगोदरच डस्ट प्रदुषणामुळे वैतागलेल्या नागरिकांच्या मानगुटीवर आता दुर्गंधीयुक्त कचरा डम्पिंग यार्डचे भूत बसले आहे.सदर विषयाला घेऊन काही दिवसांपूर्वी राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे,यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात गडचांदूर प्रदुषण त्रस्त समिती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी 30 एप्रिलपर्यंत डस्टवर नियंत्रण आणले जाईल आणि सध्या ओला कचरा बोलावणे आम्ही बंद केले आहे.असे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.मात्र, पुन्हा लपून छपून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या गाड्या येणे सुरू झाल्याने अखेर त्रस्त शहरवासीयांनी स्वत: या गाड्या कंपनीत जाण्यास मज्जाव करणे सुरू केले आहेत.

असे असताना दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारा माणिकगड कंपनी गेटसमोर ओल्या कचऱ्याची दुर्गंधीयुक्त गाडी नागरिकांनी पकडली.प्रदूषण त्रस्त समिती आणि स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांमध्ये झालेल्या अनेक घडामोडीनंतर माणिकड कंपनी प्रशासनाने पत्रही ल आणून दिले."यापुढे ओला कचरा येणार नाही." परंतू,24 तासही झाले नाही! तोच 16 फेब्रुवारी रोजी ओल्या कचऱ्याची दुर्गंधीयुक्त गाडी नागरिकांनी पकडली.आणि तो कचरा कंपनीच्या मुख्य द्वारावर खाली केला.यावेळी सुद्धा घडलेल्या अनेक घडामोडीनंतर मध्ये रात्रीच्या सुमारास (3 वा.) पुन्हा एकदा माणिकगड कंपनीकडून पत्र देण्यात आले. नगरपरिषदेला हाताशी धरून कंपनी प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून लोकप्रतिनिधींची भुमिका संशयास्पद बनली आहे.सदर प्रकरणी अनेक आरोप सत्ताधाऱ्यांवर होत असून आंदोलन उभारण्यासाठीच्या घडामोडीना वेग आल्याचे चित्र आहे.नागरिकांचा कंपनी विरोधात रोष पाहता,कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
'नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया.'
शहरातील मधोमध विराजमान माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मोठ्या प्रमाणात डोक्याला ताप बनली असून कंपनी प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू केला आहे. आम्हाला कंपनीचा विरोध नाही.फक्त एवढीच मागणी आहे की, कचरा डम्पिंग यार्ड इतरत्र घेऊन जावे,हा डम्पिंग यार्ड शहरात असल्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. स्थानिक नगरपरिषदेने याविषयी गांभीर्याने विचार करायला हवा!मात्र,असे होताना दिसत नाही.निवडणुक प्रचारादरम्यान जनहिताच्या मोठमोठ्या गोष्टी हाकणाऱ्यांनी जनतेची मते घेऊन सत्ता स्थापन केली.आता यांना जनतेच्या समस्यांपेक्षा जास्त कंपनीच पुळका आला आहे.फसलो भाऊ, खरच सांगतो,यांना शहरातील सर्वोच्च पदावर बसवून आम्ही मोठी चुक केली.त्यावेळी काही सुचेनासे झाले होते,मोहनी टाकल्या सारखे यांच्या व्हिजनवर विश्वास केला आणि आता काय चालले हे आपण पाहतच आहो.दिलेले मत परत घेण्याचा कायदा असता तर आम्ही चुक सुधारली असती!सध्याचे वातावरण पाहून नगरपरिषदेकडून जास्त अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरणार असून जनतेनेच एकजुटीने मोठे आंदोलन उभारण्याची गरज आहे.ही कंपनी आमच्या मरणावर टपली असून आम्हाला जगण्याचा अधिकार आहे की नाही? असे संतप्त आणि जळजळीत भावना काही सुज्ज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कंपनीकडून होणाऱ्या या समस्यांविषयी 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता जेष्ठ नागरिक सभागृहाच्या खुल्या पटांगणावर प्रदुषण त्रस्त समितीने शहरातील नागरिकांची एक बैठक आयोजित केली आहे.यामध्ये सर्वांचे मत घेऊन पुढची दिशा ठरवणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.पाहू यातून काय निष्पन्न होते.
#Manikgarh(Ultratech) Cement Works V/S Gadchandur Citizen.
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
