Gadchandur : शहरात सध्या माणिकगड (अल्ट्राटेक)सिमेंट कंपनीकडून होणाऱ्या डस्ट प्रदुषण आणि कचरा डम्पिंग यार्डचा मुद्दा ऐरणीवर असून यासाठी प्रदूषण त्रस्त संघर्ष समितीने मोठी चळवळ उभी केली आहे.विशेष सभा घेऊन शहरातील कचरा डम्पिंग यार्ड इतर ठिकाणी हलवावा व डस्ट प्रदुषणावर नियंत्रण आणावे,असा ठराव नगरपरिषदने घ्यावा.अशी मागणी समिती व गडचांदुरकरांची होती.मात्र,याकडे दुर्लक्ष करून सर्वसाधारण सभेत 25 व्या नंबरवर(सर्वात शेवटी)सदर विषय घेण्यात आला. त्यामध्ये डम्पिंग यार्ड स्थलांतराचा मुद्दाच नव्हता,अशी माहिती आहे.सदर विषय अत्यंत संवेदनशील असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सर्वांच्या नजरा सभेत काय घडते याकडे लागल्या होत्या.सकारात्मक ठराव पास करून दिलासा मिळेल अशी आशा नागरिकांना असताना अखेर गडचांदुरकरांचा गेम झाला.सभागृहात विपरीतच घडले.सत्ताधाऱ्यांची धडपड लक्षात घेतली तर ते पहिल्यापासूनच कंपनीच्या समर्थनार्थ होते. आश्चर्य एकच वाटले की,विरोधी पक्ष नगरसेवकांनी याला पाहिजे तसा विरोध केला नाही.सभेमध्ये बसायला खुर्च्या नव्हत्या म्हणून आक्रमक भूमिका घेणारे विरोधी पक्ष नगरसेवक,यावेळी मवाळ भुमिकेत का? असे एकना अनेक तर्कवितर्क लढवले जात असून यामुळे विरोधी पक्षाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.
'नागरिकांचा संताप शिगेला.'
प्रदुषणाच्या मुद्द्यावरून पुर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांनी कंपनीवर 33 हजार,500 रुपयांची दंडात्मक कारवाई केली होती.मात्र,सध्याचे मुख्याधिकारी यांनी त्याच प्रकरणात कारवाई करण्याचा अधिकार नगरपरिषदेला नाही,असे सांगितल्याची माहिती आहे. यावरून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून “आधीचे मुख्याधिकारी कारवाई करतात आणि हे म्हणतात अधिकार नाही!हे कसे शक्य आहे." असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.सध्या तापलेल्या सदरच्या विषयाला पुढे ढकलण्यासाठी संगणमताने हा कटकारस्थान रचला गेल्याचे आरोप नागरिकांकडून होत असून उलटसुलट चर्चांना कमालीचे उधाण आले आहे.एकिकडे कंपनीवर कारवाईचे अधिकार नसल्याचे मुख्याधिकारी सांगतात तर दुसरीकडे विरोधी पक्ष अपेक्षा भंग करतात,यावरून स्पष्ट होत की,कंपनीपुढे गडचांदुरकरांची समस्या मोठी नाही.हा निव्वळ जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असून 'नेते मस्त जनता त्रस्त,' असे संतापजनक मत व्यक्त होत आहे.नगरपरिषदेत पोलीस बंदोबस्त होता,प्रदुषण आणि कचरा डम्पिंग यार्ड स्थलांतर विषयाबाबत काय घडते याची जनता आतुरतेने वाट पाहत होती.एकुणच वातावरण पाहता असे वाटत होते की,आजच्या सभेमध्ये जनतेच्या या समस्येला घेऊन मोठा राडा होईल.पण 'खोदा पहाड, निकला चुहा.' बरोबर जमवला भाऊ सर्वांचे धन्यवाद' अशी जळजळीत भावना सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे.
#Shocking News...
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
