Korpana : तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2025 मध्ये पार पडली.यामध्ये शहर विकास आघाडीचे निलेश ताजने शहराध्यक्ष म्हणून निवडून आले.त्यांनी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली.शहर 'विकासाचे व्हिजन' तयार असल्याचे ताजने यांनी निवडणुकी प्रचारादरम्यान सांगितले होते. त्याच 'व्हिजन'चा पहिला टप्पा म्हणून जुन्या मंजूर असलेल्या सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे कळते.मात्र,सदर काम आपल्याच हितचिंतकाला मिळावे म्हणून सत्ताधारी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याची चर्चा असून,असे असेल तर ही निवडणुकीत समर्थनार्थ केलेल्या कामाची परतफेड असावी! अशी उपहासात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,जाचक अटी-शर्ती असलेल्या सदर कामाची ऑनलाईन निवीदा 6 कंत्राटदारांनी टाकली.मात्र,निवडणुकीत खांद्याला खांदा लावून उघडपणे तर काहींनी गुप्तपणे प्रचार करून निवडून आणलेल्यापैकी अगदी जवळच्या ठेकेदारालाच काम मिळावा म्हणून व्यवस्थीतरित्या नियोजन केले जात असून 'त्या' ठेकेदाराला ऑनलाईन निविदे सोबतच दोन जणांना सपोर्टर म्हणून भराव्यास लावल्याची चर्चा आहे.सदर प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे इतर काहींनी सुद्धा निविदा भरल्या आणि निविदेत स्पर्धा निर्माण झाली.नेमकं याच स्पर्धेचा नगरपरिषदेला आर्थिक लाभ होणार हे तेवढेच खरे. सदरच्या निविदेची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी होती,18 ला टेक्निकल बिट ओपन करायचे होते,ते केले.निविदा धारकांचे काही कागदपत्रे कमी असल्यास त्याची पूर्तता करण्यास अजूनही सांगण्यात आले नसल्याचे कळते.आता जवळपास 8 दिवस लोटत असताना,निविदा समिती पूढील प्रक्रिया करण्यास वेळ घेत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून तर ही प्रक्रिया थांबविण्यात येत नसेल ना? अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.
असे असताना मात्र,सदरचे काम आपल्याच हितचिंतक ठेकेदारला मिळाले पाहिजे? या दिशेने काही सत्ताधारी आटोक्याचे प्रयत्न करीत असून इतर निविदा धारक ठेकेदाराला भविष्यातील मिळणाऱ्या लाभाचे प्रलोभन दाखवून व इतरच्या बाबी पुढे करून आताची निविदा मागे घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.त्यांच्या आवडीच्या आणि हितचिंतक ठेकेदारला जर काम मिळाले तर कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते? त्याच बरोबर नगरपरिषदेला मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागेल,अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
वास्तविक पाहता निविदांमध्ये स्पर्धा व्हावी व लाभ व्हावा म्हणून कित्येक नगरपरिषद निविदेतील अटी-शर्तीत शिथिलता आणत असल्याचे चित्र आहे.मात्र,गडचांदूर नगरपरिषद याला अपवाद ठरत असून विजयासाठी केलेल्या परिश्रमाची परतफेड म्हणून इतर कोणीही स्पर्धेत येऊ नये,आपल्या त्या हितचिंतक ठेकेदारालाच काम मिळावे म्हणून जाचक अटी टाकून निविदा टाकल्या जात आहे.निविदेत स्पर्धा वाढली तर निश्चितच ठेकेदार कमी दरात निविदा टाकतील,आणि त्याचा फायदा थेट नगरपरिषदेला होऊ शकते.परंतू,येथील सत्ताधारी आपल्याच निकटवर्तीय ठेकेदाराला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नात दिसत असल्याचे आरोप होत आहे.आता व्हिजनच्या पेटाऱ्यातून निघालेल्या पहिल्याच कामात कोणाला लाभ मिळतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहेत.
#The Vision of Development has Begun in Gadchandur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
