Chandrapur : जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.घरगुती वादातून एका विवाहित महिलेने वर्धा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे.सदर घटना 21 मार्च शनिवार रोजी उघडकीस आली असून शितल प्रशांत मुळे वयवर्ष 38 रा.सम्राट चौक बालाजी वार्ड बल्लारपूर,असे मृत महिलेचे नाव असल्याचे कळते.
पोलिसांच्या माहितीनुसार,सास्ती येथील शितल,हिने पहिल्या पतीपासून विभक्त होत बल्लापूर येथील प्रशांत मुळे,याच्यासोबत 2022 मध्ये विवाह केला होता.मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता.त्यामुळे शितल माहेरी राहत होती.20 मार्च शुक्रवार रोजी रात्री ती घरातून निघाली.मात्र,परत आलीच नाही.या प्रकरणाची माहिती माहेरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.त्यावरून घटनेची नोंद घेत पोलिसांनी संशयावरून वर्धा नदी परिसरात पाहणी केली.21 मार्च शनिवार रोजी दुपारी जवळपास 2 च्या सुमारास नदीपात्रात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.घरगुती वादातून सदर घटना घडल्याची चर्चा असून पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सदर प्रकरणाची तपास सुरू आहे.
#Suicide News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
