Action by Gadchandur Police : बेवड्या वाहनचालकांवर गडचांदूर पोलिसांची कारवाई!|Marathi News...

News@Gadchandur 🚨...

           Gadchandur : होळी,धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेषतः तीन दिवस (दि.1,2,3)विशेष मोहीम राबवून मोटर वाहन कायद्याअंतर्गत ड्रंक & ड्राईव्ह 21 व इतर 37 केसेस, असे 58 केसेस करून एकूण 2 लाख,43 हजार 500 रुपयांचा दंड आकारला,तसेच 5 वाहनांवर भा.न्या.सं.अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

   होळी आणि रमजान सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांततापूर्ण वातावरणात सण साजरे व्हावे यासाठी ठाणेदार शिवाजी कदम यांनी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कोणत्याही अप्रिय घटना घडल्याचे समोर आले नाही.वास्तविक पाहता कोरपना तालुका सर्वधर्मसमभाव जपणारा तालुका म्हणून ओळखला जातो.येथील विविध समाज बांधव एकमेकांच्या सण-उत्सवाचा आदर सन्मान करतात.यामुळे येथे मोठ्या उत्साहात शांततापूर्ण वातावरणात विविध सण-उत्सव साजरे होतात,हे मात्र विशेष.यापुढे सुद्धा हिच परंपरा कायम राखली जाणार असल्याचे मत विविध समाजातील काही बांधवांनी व्यक्त केले आहे.

#Action by Gadchandur Police... 

                              $$$$$$$$$$$$$$$$$$$$