Gadchandur : येथील मुख्य मार्गावरील संविधान चौक, बसस्थानक समोरील एका डेलीनीट्स बेकरी(दुकान)ला अचानकपणे आग लागल्याने दुकान संपुर्णपणे जळून खाक झाली.सदर घटना 15 मार्च रविवार रोजी रात्री अंदाजे 9 च्या सुमारास घडली असून या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत शेजारील दुकानांनाही वेढा घातला.मात्र,सुदैवाने शेजारच्या दुकानाचे जास्त नुकसान झाले नसून सदर दुकाना पुढील पानटपरी जळाली आहे.गजबजल्या ठिकाणी अशाप्रकारे आगीचे तांडव पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार,रविवारी रात्री सुमारे 8,साडे 8 च्या सुमारास दुकानातून अचानक धूर व ज्वाला उसळू लागल्या. आगीची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच पोलिस आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र,आगीची तीव्रता जास्त असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण झाले.त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान अग्निशामक दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.या आगीत संबंधित दुकाननदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असे अंदाज बांधले जात आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
#Gadchandur Fire Accident.#The Fier at the Shop.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
