Korpana : गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत गडचांदूर-अंबुजा मार्गावरील थुटरा बसस्थानक जवळील एका ले-आऊट परिसरात अंबुजा सिमेंट कंपनी येथील कर्मचारी अरविंद रोहणकर नामक व्यक्तीवर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून गंभीररीत्या जखमी केल्याची खळबळजनक घटना 5 मार्च रोजी रात्री अंदाजे 9 च्या सुमारास घडली.सदर प्रकरणी गडचांदूर पो.स्टे. येथे BNS चे कलम 109 अन्वये गुन्हा नोंद असून गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अरविंदला उपचारासाठी तात्काळ चंद्रपूर येथे एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा (LCB)आणि गडचांदूर पोलीस पथकाने संयुक्तपणे तांत्रिक तपास करून अवघ्या 4 तासात अंबुजा कंपनीतील खाजगी ठेकेदार हरिदास मारोती पारखी वयवर्ष 37 रा.लखमापूर ता.कोरपना, योगेश गुलाब भोजेकर वयवर्ष 43 रा.लखमापूर ता.कोरपना, यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबूली दिली.यावरून दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर, पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे गडचांदूरचे SDPO रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम,LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात LCB चे पथक आणि गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
#Attempt To Murder.#Gadchandur Crime Riport.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
