Fake Currency Notes : नकली नोटा बनवणाऱ्या इसमाला LCB कडून अटक! Marathi News.

News@Crime...

Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे पथक 10 मार्च रोजी चंद्रपूर शहरात पेट्रोलिंगवर असताना गुप्त माहिती मिळाली की, उर्जानगर मेजर गेट जवळील राजश्री अपार्टमेंट फ्लॅट क्र. 203 मध्ये काही इसम अवैधरित्या 500 रुपयांच्या रंगीत छायांकीत  (नकली)नोटा तयार करीत आहे.अशा माहितीवरून LCB च्या पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी फ्लॅटला कुलूप लागून होते.तेव्हा फ्लॅट मालक सुमीत कालीपथ पॉल रा.बंगाली कॅम्प चंद्रपूर,याला बोलावून माहिती घेतली असता,त्याने तो फ्लॅट गेल्या एक महिन्यापासून मध्यप्रदेश येथील लोकांना किरायाने दिल्याचे सांगीतले.त्यावरून फ्लॅट मालक व पंचासमक्ष फ्लॅटचे लॉक तोडून फ्लॅटची झडती घेतली असता बेडरूमध्ये 10 खरड्याच्या बॉक्स त्यामध्ये भारतीय चलनाच्या चलनी नोटाप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या 500च्या 91 लाखांच्या रंगीत छायांकीत नोटा,एक EPSON कंपनीचे कलर प्रिंटर व इतर साहित्य,असा एकूण 91 लाख,15 हजारांचा मुद्देमाल मिळून आला.सदर ठिकाणी किरायाने राहणाऱ्या आरोपीची गोपनीयरित्या माहिती काढून,त्यांचा शोध घेवून, आरोपी शुभम दिनेश नागर वयवर्ष 26 रा.पंचेड ता.जि.रतलाम (मप्र.)याला ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात SDPO  प्रमोद चौगुले,परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गौरव कायंदे पाटील,LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक कांकरेडवार,सपोनि.बलराम झाडोकर,पोउनि. संतोष निंभोरकर,पोउनि.सर्वेश बेलसरे,पोउपनि.सुनील गौरकार, पोहवा.जयसिंह,पोहवा.सचिन गुरनुले,पोहवा.संतोष येलपूलवार, पोहवा.गणेश मोहुर्ले,पोहवा.नितीन रायपूरे,पोहवा.रजनीकांत पुट्टावार,पोअं.किशोर वकाटे,पोअं.अजित शेंडे,चापोहवा दिनेश अराडे,प्रमोद डंभारे,मपोहवा.निराशा तितरे,विजयमाला वाघमारे छाया निकोडे,अपर्णा मानकर,मपोअं.दिपीका सोडणार,उषा लेडांगे यांनी केली आहे.

#Chandrapur District Crime News.#Fake Currency Notes.

                           $$$$$$$$$$$$$$$$$$$$