Action Against Cattle Transportation : गडचांदूर पोलिसांची गोवंशीय जनावरांच्या अवैधरित्या वाहतुकीवर कारवाई!| Marathi News.

News@Crime...

Gadchandur :  गडचांदूर ते पिंपळगाव मार्गे गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती 17 मार्च रोजी गडचांदूर पोलिसांना मिळताच ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात तात्काळ गडचांदूर-पिंपळगाव मार्गावर नाकेबंदी करून एका बोलेरो पिकअपला थांबवून पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये 9 गोवंश जनावरे(बैल)कोंबून दिसून आले.जनावरांना ताब्यात घेऊन प्यार फाउंडेशन गोशाळा चंद्रपूर,येथे पाठवण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली तर दुसरा फरार झाला आहे.मो.आमीन मो.शब्बीर शेख वयवर्ष 25 रा.घुग्घुस जिल्हा चंद्रपूर,असे आरोपीचे नाव असून,त्याच्या ताब्यातील 9 गोवंश जनावरे किंमत अंदाजे 1 लाख,80 हजार,एक पिकअप वाहन क्रमांक MH/34/BZ/5619,किंमत अंदाजे 5 लाख,असा एकूण 6 लाख,80 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे. 

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,गडचांदूरचे SDPO रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात नापोअं.बलवंत शर्मा,पोअं.साईनाथ उपरे, प्रकाश बाजगीर,सुरज ढोले,पोअं.मनोहर जाधव यांनी केली आहे. सदर कारवाईमुळे गोवंशीय जनावर तस्करांचे धाबे दणाणले आहे. 

#Chandrapur District Crime News.#Action Against Cattle Transportation.

                         $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$