Korpana : तालुक्यातील घरकुल लाभार्थींना जवळच्या वाळू घाटामधून मोफत वाळू देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले असून एकीकडे घरकुल धारकांना वाळू मिळत नसल्याची ओरड सुरू आहे तर दुसरीकडे या धोरणामुळे वाळू तस्करांना मात्र,अच्छे दिन आल्याचे अनुभवास येत आहे. “राॅयल्टी एक,फेऱ्या मात्र अनेक” अशाप्रकारे भोयगाव नदीपात्रातून अक्षरशः वाळूची लूट सुरू आहे.हे सुरू असताना महसूल विभाग अधिकाऱ्यांनी जणू डोळ्यांवर पट्टी बांधली की काय?अशी शंका व्यक्त होत आहे. तालुक्यात झोटिंग,वनोजा,सांगोडा,सोनुर्ली,तामसी,भैरंम,एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीवरील घाट तयार करून रात्रीच्या सुमारास अवैधरित्या वाळूची तस्करी करून बहुतांश ठिकाणी रस्त्यालगत साठवणूक केल्याची माहिती समोर येत असून महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,सोबतच पोलीस अधिकारी व त्यांच्या अधिंनस्त अनेक कर्मचारी असताना वाळूची चोरी होतेच कशी? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.दरयान वाळू मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या मदतीने ग्रामविकास अधिकाऱ्यां मार्फत सर्व घरकुल लाभार्थींना घरपोच वाळू रॉयल्टीची पावती पोहोचवणे आणि त्याची नोंद ठेवण्याचे सांगितल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,कोरपना तालुक्यातील भोयगाव महामार्गावरील पुलाजवळ नदीचे पात्र चांगलेच विस्तारले. भोयगाव येथील भैरंम वाळू घाट रॉयलटीच्या(TP)माध्यमांतून मोकळा केला असून खूप साऱ्या ट्रॅक्टर मालकांनी आपले ट्रॅक्टर घाटावर उतरवून सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाळू काढणे सुरू केले आहेत.वाळू भरून असलेल्या ट्रॅक्टरवर देखरेखीसाठी महसूल विभागाचे 4 कर्मचारी सुद्धा नेमण्यात आले आहे.त्यामुळे दिवसा ट्रॅक्टर मालक वाळू चोरण्याचे धाडस करत नाही.परंतू,कवठाळा,भोयगाव परिसरातील काही सराईत वाळू तस्कर काही अधिकाऱ्याचे हात ओले करत,एका टीपी(TP)वर पुर्ण दिवस रेती काढत असल्याचे निदर्शनास येत असून “जोपर्यंत अधिकारी आमच्या सोबत आहे,तोपर्यंत कसलाही टेन्शन घेण्याची गरज नाही” असे उदगार काही वाळू तस्कर काढत असल्याची चर्चा आहे.नेमलेले कर्मचारी जेव्हा आपले काम पूर्ण करून घाटातून निघून जातात,तेव्हा काही सराईत वाळू तस्कर ट्रॅक्टर मालक संधी साधून सायंकाळी जवळपास 7 ते सकाळी 5 वाजेपर्यंत त्याच घाटातून वाळू चोरून 7 ते 8 हजारांच्या दरात विकतात,अशी माहिती एका सुज्ज्ञ नागरिकांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या या प्रकरणावर अंकुश लावावा,अशी मागणी होत आहे.
"पोलीस प्रशासन,RTO यांनी याकडे लक्ष देण्याची गरज"
भोयगाव येथील वर्धा नदीवरील भैरंम घाटामधून रॉयल्टी(TP) पासच्या माध्यमातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू काढणे सुरू आहे. काही ट्रॅक्टर,ट्रॉलीला नंबर प्लेट नाही तर काही ट्रॅक्टर,ट्रॉलीचे कागदपत्रे आणि काही चालकांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.भविष्यात होणारी दुर्घटना टाळण्यासाठी अशा ट्रॅक्टर मालक,चालकांवर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी करत महामार्ग किंवा रस्त्याने भरधाव वेगाने ट्रॅक्टर ये-जा करीत असताना दुर्घटना घडलीच तर याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल निर्माण करत भविष्यात गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काही सुज्ज्ञ नागरिकांनी केली आहे.तसेच काही ट्रॉलींना पिवळ्या रंगाची तर काहींना पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट लागलेली दिसून येत असून परिवहन अधिकारी(RTO)यांनी भोयगाव-गडचांदूर मार्गाने येऊन ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची तपासणी करून कारवाई करावी,अशी मागणी सुद्धा करण्यात आली असून कारवाईकडे लक्ष लागले आहेत.
#Illegal Sand Mining.#New Sand Policy.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
