LPG Crisis Impact on Villages : ग्रामीण भागात गॅस टंचाई तीव्र!| Marathi News.

News@LPG Gas Shortage....

      Gadchandur : ग्रामीण भागात सध्या घरगुती गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई जाणवत आहे.भारत गॅस ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, भारत गैस एजन्सीची गाडी चंद्रपूरवरून दर आठवड्यातून दोनदा गडचांदूरला येत होती.आता जवळपास 25 ते 30 दिवसाचा कालावधी लोटुनही गॅसची गाडी आली नाही.यामुळे ग्रामीण भागातील शेकडो ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे.सणासुदीचे दिवस असल्याने गॅस सिलिंडरची समस्या डोकेदुखी बनली असून गॅस टंचाईने ग्रामीण भागातील शेकडो ग्राहक होरपळून निघत आहे.गॅसची गाडी का येत नाही, यासंदर्भात माहिती घेण्यासाठी भारत गॅस एजन्सीच्या चंद्रपूर येथील कार्यालयात संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर फोन लागत नसल्याचे बोलले जात आहे.

       गडचांदूर येथे इन्डेन गॅस एजन्सी असल्याने त्यांच्या ग्राहाकांना कसेबसे सिलिंडर मिळत आहे.HP आणि भारत गॅसची एजन्सी जिल्ह्याच्या ठिकाणी चंद्रपूर येथे आहे.भारत गॅस एजन्सीची गाडी आठवड्यातून दोनदा(शुक्रवार आणि मंगळवार)गडचांदूर, हरदोना,उपरवाही,येथे येत होती.मात्र,गेल्या जवळपास 25 ते 30 दिवसांपासून गाडी इकडे फिरकलीच नाही.यामुळे घरगुती गॅसची समस्या उभी ठाकली आहे.राॅकेल शासनाने बंद केले! काड्या मिळत नाही,स्वयंपाक कसा करायचा,अशी समस्या निर्माण झाली असून भारत गॅसच्या ग्रामीण भागातील ग्राहकांना विशेषतः गृहिणींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.एकीकडे सरकार म्हणते गॅसचा तुटवडा नाही? तर दुसरीकडे आम्हाला गॅस मिळत नाही! नंबर लावायचा प्रयत्न केला तर संपर्क होत नाही.शहरात अगोदरच घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोठमोठ्या रांगा लागत आहे.त्यांनाच 8,8 दिवस सिलिंडर मिळत नाही.60 ते 70 किमी वरून आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन काय करायचा!असे संतप्त मत भारत गॅसच्या एका ग्राहकाने व्यक्त केले आहे.ग्रामीण भागातील नागरिकांच्या या समस्येकडे शासन-प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा,गॅस वितरण व्यवस्था सुधारून नागरिकांना वेळेत सिलिंडर उपलब्ध करून द्यावे,यासाठी लोकप्रतिनिधींनी सुद्धा लक्ष देऊन गृहिणींना दिलासा द्यावा,अशी विनंती वजा मागणी करण्यात आली आहे.आता ग्रामीण भागातील ग्राहकांना दिलासा मिळेल का? याकडे लक्ष लागले आहे.

#Big Problem.#LPG Gas Shortage.#LPG Crisis Impact on Villages.                   

                                   $$$$$$$$$$$$$$$$$$$