Korpana : तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं.104 मधील ओपन स्पेसवर मुस्लिम समाजाचे ईदगाह आहे.त्याला अगदी लागून असलेल्या नालीतून त्या वार्डाचे संपूर्ण सांडपाणी वाहून जाते.मात्र,त्या पाण्याला समोर जाण्यासाठी मार्ग नसल्याने एका ठिकाणी जमा होऊन ईदगाह समोर दुर्गंधी पसरली आहे.गेल्या वर्षी राजुरा विधानसभेचे धडाकेबाज आमदर,विकासपुरुष देवराव(दादा)भोंगळे,यांनी ईदगाह कार्यक्रमाला भेट दिली असता भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद डोहे,यांनी आ.भोंगळे यांना ईदगाह समोरील परस्थिती दाखवली.तेव्हा आमदार भोंगळे यांनी लगेच न.प.मुख्याधिकारी यांना दुरध्वनीवरून माहिती दिली की, “कुठल्याही समाजाच्या धार्मिकस्थळासमोर घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी पसरणे योग्य नाही,स्वच्छ वातावरण असणे गरजेचे आहे. तात्काळ मुस्लिम समाजाचे पवित्र स्थळ ईदगाह समोर निर्माण झालेली समस्या कायमस्वरूपी मार्गी लावा.” असे सांगितले तेव्हा लगेच नगरपरिषद फंडातून येथील नाली,पुलीया व रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले.दरम्यान 5 जुलै 2025 रोजी आ.भोगळे यांच्या हस्ते सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
त्यानंतर लगेच कामाचा कार्याध्यक्ष देण्यात आला.याच दरम्यान नगरपरिषद निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे काम होऊ शकले नाही.डिसेंबर 2025 रोजी निवडणूक पार पडली. विकासाचे व्हिजन घेऊन याठिकाणी नव्याने सत्ता स्थापन झाली. असे असताना जवळपास 3 महिन्याचा कार्यकाळ लोटूनही पुर्वी मंजूर असलेल्या कामाला सुरुवात झाली नाही.मुस्लिम समाजाचे पवित्र रमजानचे रोजे(उपवास)समाप्त होऊन येत्या शुक्रवार किंवा शनिवार रोजी शहरातील सर्व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन या ईदगाहवर विशेष नमाज पठण करणार आहे. गेल्यावर्षी माजी नगरसेवक अरविंद डोहे यांच्या अथक परिश्रमाने जुन्या ईदगाह स्थळाला खरे स्वरूप प्राप्त झाले.जाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा पुल निर्माण केला.मात्र,यंदा सांडपाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे.ये-जा करण्यासाठी नेहमीचा रस्ता नाही, अशा परिस्थितीत मुस्लिम बांधव ईदची नमाज पठण करणार आहे! ईद जवळ आली,हे माहीत असतानाही काम न होणे,याला सत्ताधाऱ्याचे अपयश म्हटले तर वावगे ठरणार नाही.सध्याची परिस्थिती पाहून 'हेच का तुमचे विकासाचे व्हिजन' अशी विचारणा होत आहे.
"संबंधीत ठेकेदाराची प्रतिक्रिया काय."
सदर काम माझ्याकडे असून नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक लागल्याने काम बंद होते.नुकताच नगरपरिषदेने याठिकाणी नालीच्या कामासाठी ले-आऊट टाकून दिले होते.नाली खोदण्यात आली.नाली माझ्या जागेवर येत असल्याचे सांगत येथील एका प्लाट धारकाने काम थांबवले आहे,नवीन ले-आऊट टाकून दिल्यानंतर कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती संबंधित ठेकेदाराने दिली आहे.
#Vikas Vision.#Vision of Development.#NP.Gadchandur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
