Illegal Gambling Raid : जुगार खेळणाऱ्या 10 जणांना अटक, 2 फरार!|Marathi News.

News@Gambling...

  Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 3 फेब्रुवारी रोजी सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकून जुगार खेळणाऱ्या 12 जणांनवर कारवाई करून सिंदेवाही पो.स्टे.येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.10 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 2 जण फरार झाले आहे.सदर गुन्ह्यात डावावरील 1 हजार 500,आरोपींच्या अंगझडतीत 19 हजार,200,ताश किंअं.50 रु. आणि 7 दुचाकी  असा 2 लाख,70 हजार,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

   सलिम चांद खान पठाण वयवर्ष 30,दिपरत्न अंबादास खोब्रागडे वयवर्ष 31,जावेद कादर खान पठाण वयवर्ष 32,अरुण प्रभाकर नन्नावरे वयवर्ष 50,संतोष तुळशीराम नान्हे वयवर्ष 42,पांडुरंग देवाजी पुसतोडे वयवर्ष 45,पुरुषोत्तम मणिराम बांबोळे वयवर्ष 50,प्रकाश कवडू आदे वयवर्ष 35,सारंग जगन्नाथ निमगडे वयवर्ष 47,जितेंद्र महादेव करकाडे वयवर्ष 44(सर्व रा.सिंदेवाही)यांना अटक करण्यात आली असून निखील राऊत रा.नांदेड ता. नागभीड आणि एका दुचाकी चालक फरार झाला असून यांचा शोध सुरू आहे.गुन्ह्याची पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोहवा.जयंत चुनारकर,अजित शेंडे,प्रदीप मडावी,नितेश महात्मे आणि गजानन मडावी सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.

#Illegal Gambling Raid.#LCB Action Against Gamblers. #Chandrapur District Crime News.

                                $$$$$$$$$$$$$$$$$$$$