Korpana : मुस्लिम समाजाचे पवित्र रमजान (माहे रमजान).या महिन्यात ठिकठिकाणी आयोजित इफ्तार पार्ट्यांतून सामाजिक एकोपा,बंधुभाव व सर्वधर्मसमभावाचा संदेश जगभरात दिला जात आहे.असे असताना नेहमी सामाजिक सलोखा व सर्वधर्मसमभाव जोपासणारे बावणे परिवारातर्फे 17 मार्च रोजी कोरपना जामा मशिदीत अत्यंत आपुलकी आणि धार्मिक वातावरणात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे तसेच कोरपना नगरपंचायतचे नगरसेवक नितीन बावणे यांच्या पुढाकारातून आयोजित सदर इफ्तार पार्टीत शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून एकत्रितरित्या इफ्तार करून,या पवित्र महिन्याचा आनंद सामायिक केला.याप्रसंगी उपस्थितांनी एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा देत आपसी प्रेम, भाईचारा आणि एकतेचे दर्शन दिले.
रमजानचा महिना,हा संयम आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र महिना आहे.अशाप्रकारच्या इफ्तार पार्ट्यातून समाजात एकोपा, सद्भावना आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होते.तसेच सामाजिक,धार्मिक कार्यक्रमांद्वारे विविध समाज घटकांना एकत्र आणून परस्परातील प्रेम आणि विश्वास वाढविणे,हे कार्य कौतुकास्पद असून अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होते.असे मत व्यक्त करत उपस्थित मुस्लिम बांधवांनी आयोजकांचे तोंडभरून कौतुक केले.या मंगलमय वातावरणात बावणे परिवारातर्फे आयोजित इफ्तार पार्टीने,भाईचारा,सौहार्द आणि एकतेचा अप्रतिम संदेश दिल्याचे मत विविध माध्यमांतून व्यक्त होत आहे.
#Iftar Party in Korpana City..
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
