Gadchandur : होळी,धुळीवंदनाच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर पोलीस अलर्ट मोडवर असून वरिष्ठांच्या निर्देशानुसार होळीच्या काळात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे.महिलांशी गैरवर्तन,अमली पदार्थ तस्कर आणि अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.2 आणि 3 मार्च रोजी होळी-धुलीवंदन,हे सण शांततापूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहेत. शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून मद्यपान करून वाहने चालवणाऱ्या विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी कोणीही गोंधळ घातल्यास,या सणाला गालबोट लावल्यास, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,याची दक्षता घ्यावी,असे आवाहन ठाणेदार शिवाजी कदम यांनी 'कोरपना Live' च्या माध्यमातून नागरिकांना केले आहे.
#Holi Festival 2025...
#Gadchandur police alert in view of Holi festival...
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
