Gadchandur : कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व औद्योगिक नगरी गडचांदूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा 11 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये शहरातील विविध प्रभागातील विकास कामांचे विषय,अशा एकूण 25 विषयांवर चर्चा व ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.मात्र,यातील सर्वात शेवटचा 25 व्या विषयावर गडचांदुरकरांचे विशेष लक्ष लागले आहे.नेमकं असं काय आहे यामध्ये ? ज्यासाठी स्थानिक नागरिक सकारात्मक ठराव मंजुरीसाठी आक्रमक भूमिकेत दिसत आहे?
'नेमकं प्रकरण काय?'
स्थानिक माणिकगड (अल्ट्राटेक)सिमेंट कंपनीकडून होणाऱ्या डस्ट प्रदुषण आणि कचरा डम्पिंग यार्डची दुर्गंधी,गडचांदूरकरांच्या जिव्हारी लागली आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिक डस्ट प्रदुषणामुळे हैराण असताना आता कंपनीने लोकवस्तीत कचरा डम्पिंग यार्डची निर्मिती करून गडचांदुरकरांचे जगणे कठीण केले आहे.100 लोकांच्या आरोग्याची तपासणी केली तर 98 लोकांना खाज,डोक्याचे केस गळणे,दमा,खोकला,फुफ्फुसाचे आजार असल्याचे निष्पन्न होईल.डस्ट प्रदुषणामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.यासाठी अनेक आंदोलने झाली मात्र सकारात्मक परिणाम दिसून आले नाही.असे असताना आता यावर कचरा दुर्गंधीची भर पडली आहे.कंपनीत जाळण्यासाठी दुरदुरूच्या विविध शहरातून अतिशय खराब कचरा मोठमोठ्या वाहनांद्वारे याठिकाणी आणला जात आहे. डम्पिंग यार्ड शहरात असल्याने नागरिकांना कचऱ्याच्या जीवघेण्या दुर्गंधीने हैराण करून सोडले आहे.
दुर्गंधीमुळे जेवण होत नाही,किती पण उदबत्त्या लावा वास काही जात नाही,दुर्गंधी असह्य होत असल्याने मळमळ,उलटी, डोकेदुखी,अशी लक्षणे जाणवत असून संपूर्ण शहरवासीय जनता याच्यामुळे त्रस्त झाले आहेत.कंपनी प्रशासनाने डस्ट प्रदुषणावर नियंत्रण आणावा,कचरा डम्पिंग यार्डला शहराबाहेर न्यावे,यासाठी 'गडचांदूर प्रदुषण त्रस्त संघर्ष समिती' नावाने सोशल मीडियावर एका व्हाट्सअप ग्रुपची निर्मिती करण्यात आली.त्यावरील सदस्य सदर दोन्ही विषयाला घेऊन आचारविचारांची देवाणघेवाण करून आपापली व्यथा मांडतात.याचेच परिणाम म्हणावे की काय? कंपनी प्रशासनाची झोप उडाल्याचे चित्र आहे.एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे नवनियुक्त नगराध्यक्षांनी निवडणुक प्रचारात अनेक कामांसाठी व्हिजन तयार असल्याचे सांगून जनतेला भव्यदिव्य स्वप्न दाखवले.सत्ता स्थापनेला जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी शहरात उल्लेखनीय असे काही होताना दिसत नाही. ''विकास कमी,विवाद जास्त'' अशी काहीशी परिस्थिती सध्या दिसत असल्याची चर्चा शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.
'काही सुज्ज्ञ नागरिकांची प्रतिक्रिया.'
शहरातील इतर कामांचे सोडा,गडचांदुरकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न म्हणजे,स्थानिक सिमेंट कंपनीचे डस्ट प्रदुषण आणि कचऱ्याची दुर्गंधी,हे असून स्थानिक नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत गडचांदुरकरांना होणारा त्रास आणि भावनेचा आदर राखुन कंपनी विरोधात एकमताने ठराव मंजूर करून दिलासा द्यावा, अशी मागणी असताना सदर महत्वपूर्ण विषय सर्वात शेवटी 25 व्या नंबरवर ठेवण्यात आल्याने सत्ताधारी या समस्येला घेऊन किती गंभीर आहे? हे वेगळे सांगायला नको.आता सभेत काय घडते,किती जण कंपनीच्या विरोधात जातात? आणि किती जण नागरिकांच्या बाजूने राहतात? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. असे मत काही सुज्ज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
#Monthly meeting of Gadchandur Municipal Council.
¢$¢$¢$¢$¢$¢$¢$¢$¢$¢
