Eid ul-fitr(Ramzan)2026 : गडचांदुरात रमजा़न ईद उत्साहात साजरी!|Marathi News.

News@Eid ul-fitr 2025...

        Gadchandur : "यंदाची ईद सर्वांच्या जीवनात आनंद,सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो,समाजात प्रेम,सौहार्द, एकता,बंधुत्व अधिक दृढ होवो,जातीपाती,भेदभावाच्या भिंती तोडून सर्वसमाजाने बंधुता जोपासली पाहिजे, "हिंदू असो वा मुस्लिम,रक्ताचा रंग शेवटी लालच'' असे आपुलकीने मत राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी व्यक्त केले.ते मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद निमित्ताने गडचांदूर येथील ईदगाहला दिलेल्या भेटी दरम्यान बोलत होते.यावेळी त्यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

                 ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद 21 मार्च शनिवार रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.रमजानचा एक महिना मुस्लिम बांधवांकडून उपवास(रोजा़)ठेवल्यानंतर आजच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा सण हर्षोल्लासात साजरा केला जातो.याच पार्श्वभूमीवर कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूरातही मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली.सकाळपासुनच मुस्लिम बांधव रमजा़न ईदची विशेष नमाज पठण करण्यासाठी येथील लखमापूर रोडवरील ईदगाहमध्ये एकत्रित जमले होते.रजा़ मशिदीचे ईमाम मौलाना सैय्यद हसनैन रज़ा,यांच्या नेतृत्वात नमाज पठण करण्यात आली.दुसरीकडे ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी खबरदारी म्हणून गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम,यांच्या नेतृत्वात मोठ्याप्रमाणत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.शहर भाजपतर्फे मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच पुष्पवर्षाव करून ठाणेदार शिवाजी कदम आणि त्यांच्या टीमचे स्वागत करण्यात आले.एकूणच हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

#Eid ul-fitr(Ramzan)2026...                                                                                                      --------//-----------