Crime News : घरफोडीतून लाखोंचे दागिने लंपास!|Marathi News.

News@Crime...

            Chandrapur : शहरातील रामनगर पोलीस स्टेशन येथे 7 फेब्रुवारी रोजी शुभम प्रदिप बारधमवार वयवर्ष 30 रा.चिंतामणी रेसिडन्सी वडगाव,यांनी तक्रार दिली की,मी 6 फेब्रुवारी रोजी आपल्या परिवारासोबत राजुरा येथे एका नातेवाईकाच्या लग्न कार्यक्रमासाठी गेलो होतो.आणि दुसऱ्या दिवशी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 च्या सुमारास घरी आले असता घराच्या समोरील दरवाज्याचे कुलूप तुटून दिसले.लगेच आत जाऊन बघितले तर लॉकर तोडून त्यातील सोने,चांदीचे दागीने तसेच रोख रक्कम कोणी तरी अज्ञात चोराने चोरून नेली.तसेच त्याच दिवशी शुभम बारधमवार यांच्या घरा शेजारी सिध्दी अपार्टमेंटमधील राहणाऱ्या सौ.ज्योती दिनेश चंदनपाट वयवर्ष 54,यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोने,चांदीचे दागीने आणि रोख रक्कम कोणी तरी अज्ञात चोराने चोरी करून नेल्याची सुद्धा तक्रार देण्यात आली होती.या दोन्ही तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून तपासाला सुरुवात केली.

दोन्ही गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखा(LCB),रामनगर पोलीस स्टेशन,यांना सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.त्यावरून LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व रामनगरचे ठाणेदार आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात पोउपनि.विनोद भुरले तसेच सपोनि.शिवाजी नागवे रामनगर पोलीस स्टेशन,यांचे दोन वेग-वेगळे पथक तयार करून घटनास्थळाच्या आजुबाजुच्या परिसरातील सतत 10-12 दिवस CCTV फुटेजचा पाठलाग करून तसेच तांत्रिक पद्धतीने विश्लेषण करून कौशल्यपुर्ण तपासाद्वारे सदर आरोपी,हे मौजा तांडा,जिल्हा धार(मध्यप्रदेश)येथील असल्याचे निष्पन्न केले.यांना ताब्यात घेण्यासाठी LCB चे पोउपनि.विनोद भुरले तसेच रामनगर पोस्टचे सपोनि.शिवाजी नागवे,येथील दोन पथक रवाना करून त्या चारही आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले 329 ग्रॅम सोन्याचे दागीने किमंत अंदाजे 51 लाख,98 हजार,गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन क्रमांक GJ/14/AP/ 4098 व 6 मोबाईल,असा एकूण 57 लाख,50हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दरम्यान आरोपींना अधिक विचारपुस केली असता त्यांनी यापुर्वीही चंद्रपुर जिल्ह्यात वेग-वेगळ्या 4 ठिकाणच्या घरफोडीतून सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरी केल्याचे सांगितले आहे.राकेश मंगलसिंग मेहदा वयवर्ष 25 रा. बागोली तहसील कुक्षी जिल्हा धार (मध्य प्रदेश),कंचन भगतसिंग मंडलोही वयवर्ष 40 रा.बघोली ता.कुक्षी,जि.धार(मध्यप्रदेश), थानसिंग मेहतू भुरीया वयवर्ष 26 रा.बडीउपी ता.जोबट जि. अलीराजपूर(मध्यप्रदेश),महेश कालू भुरीया वयवर्ष 25 रा. गुराडीया ता.कुक्षी जि.धार(मध्यप्रदेश),असे आरोपींची नावे असून अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,SDPO प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे तसेच रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.सुनिल गौरकार,सपोनि. शिवाजी नागवे,पोउपनि.क्रिष्णा दराडे,पोहवा.सुभाष गोहोकार, पोहवा.सतिश अवथरे,पोहवा.रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा.दिपक डोंगरे,पोहवा.इम्रान खान,पोअं.हिरालाल गुप्ता, पोअं.किशोर वाकाटे,पोअं.शशांक बदामवार LCB चंद्रपूर तसेच पोहवा.आनंद खरात,पोअं.संदिप कामडी,पोअं.प्रकाश मडावी,पोअं.प्रफुल पप्पुलवार,पोअं.पंकज ठोबरे सायबर पोलीस ठाणे पोहवा. कार्तीक खनके,पोहवा.विरू यादव,पोअं.वैभव पत्तीवार, पोअं.गुणवंत मुंडके यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्यांनी केली आहे.

#Chandrapur District Crime News Apdate.

                               $$$$$$$$$$$$$$$$$$$$