Chandrapur Crime : 55.9 ग्रॅम MD ड्रग्ससह एकाला बेड्या,!| Marathi News.

News@MD Drugs...

Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे पथक 20 मार्च रोजी पेट्रोलिंगवर असता गुप्त माहिती मिळाली की,एक इसम स्थानिक सपना टॉकीजच्या मागे,जलनगर वार्डातील गुलवाडे हॉस्पीटल जवळ,रामाळा तलाव रोड,येथे मेफोड्रोन ड्रग्स(MD Drugs)पावडर विक्रीसाठी घेवून येणार आहे.अशा खात्रीशीर माहितीवरून तात्काळ रामाळा तलाव रोड,मनपा ओपन गार्डन येथे सापळा रचून आरोपी माधव नारायण मामीड वयवर्ष 36 रा.सपना टाकीजच्या मागे,जलनगर वार्ड चंद्रपूर,याला ताब्यात घेवून त्याच्याकडून 55.9 ग्रॅम मॅफेड्रोन(MD)ड्रग्स पावडर,एक जुनी वापरती ज्युपीटर कंपनीची दुचाकी क्रं.MH/34/BN/4861,असा एकूण 3 लाख,55 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले,पोउपनि.सुनिल गौरकार,पोहवा.सुभाष गोहोकार,पोहवा. सतिश अवथरे,पोहवा.दिपक डोंगरे,पोहवा.इम्रान खान,पोहवा. सचिन गुरनुले,पोअं.हिरालाल गुप्ता,पोअं.किशोर वाकाटे,पोअं. शशांक बदामवार,पोअं.अजीत शेंडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

#Chandrspur District Crime News.#MD Drugs.#Action by LCB Chandrapur.

                                $$$$$$$$$$$$$$$$$$$$