Chandrapur : जिल्ह्यातील सावली पोलिसांनी 15 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास गोवंश तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. सावली आणि सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीत 2 ठिकाणी नाकाबंदी तोडून पळणाऱ्या एका आयशर ट्रकला पाठलाग करून पकडले.ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले तर एकजण अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे.दरम्यान 39 गोवंशीय जनावरांची सुटका करून सर्व जनावरांना 'प्यार फाउंडेशन चंद्रपूर' येथे पाठवण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार,सावली पोलीस पथक गस्तीवर असतांना, त्यांना एक आयशर ट्रक संशयीतरित्या व्याहाड मार्गे सावलीकडे येताना दिसला.पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला मात्र, ट्रक न थांबवता चालकाने बॅरिकेड्सला धडक देऊन ट्रक मुल रोडवरून सिंदेवाहीकडे पळवला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलिसांनी सिंदेवाही पोलिसांना नाकाबंदीच्या सुचना दिल्या आणि स्वतः वाहनाने ट्रकचा पाठलाग सुरू केला.दरम्यान सिंदेवाही येथेही आरोपीने पोलिसांचे दुसरे बॅरिकेड्स उडवून पळण्याचा प्रयत्न केला.मात्र,हेडलाईट फुटल्याने आणि पोलीस पाठलाग करत असल्यामुळे आरोपीने शहराबाहेर ट्रक थांबवला. पोलिसांनी ट्रक चालक शाबीर शेख वयवर्ष 42 रा.यशोधरा नगर रोड नागपूर,याला अटक केली असून 39 जनावरे किं.अं. 3 लाख, 90 हजार,आयशर ट्रक क्र.TS/09/UB/8387 किं.अं. 19 लाख, असा एकूण 22 लाख,90 हजारांचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपींविरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे SDPO सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात सावलीचे ठाणेदार प्रदिप पुल्लूरवार,पोउपनि. सचिन मुसळे यांच्यासह पोलीस पथकाने केली आहे.
#Chandrapur District Crime Apdate #Action Against Cattle Transportation.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
