Chandrapur : जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी 1 मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून 8 लाख,48 हजारांचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक केली आहे.गोंडपिपरी पोलीस परीसरात पेट्रोलींगवर असताना गुप्त माहिती मिळाली की,एका बोलेरो पिकअप वाहनातून एक ईसम विठ्ठलवाडा मार्गे भंगाराम तळोधी गावाकडे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करीत आहे.अशा माहीतीवरून तात्काळ नाकेबंदी करून सदर वाहन चालक सुदाम रामजी जाधव वयवर्ष 37 रा.अंदुगुडा ता. गुडामामडा जि.आदिलाबाद व मालक मोहम्मद मुजताब अली रा. वांकडी जि.आसीफाबाद,यांच्या ताब्यातील बोलेरो पिकअप वाहन क्र.TS/20/T/6857 ची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये 10 नग गोवंशीय जनावरे,ज्यामध्ये 8 जीवंत आणि 2 जनावरे मृत अवस्थेत आढळून आले.पोलिसांनी 8 जनावरे किं.अं. 1 लाख,40 हजार,बोलेरो पिक अप वाहन किं.अं.7 लाख,जुना वापरता मोबाईल किं.अं.8 हजार,असा एकूण 8 लाख,48 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे SDPO सत्यजित आमले, यांच्या मार्गदर्शनात,गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या नेतृत्वात सहाफौ.गोकुलदास मडावी,पोअं.प्रविण कडुकर,पोअं. आकाश गुंजकर,चालक सहफौ.पुनेश्वर कुळमेथे पोलीस स्टेशन गोंडपिपरी यांनी केली आहे.
#Chandrapur District Crime News Update.#Action Against illegal Cattle Transportation.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
