Murder Case : युवकाचा खुन करून पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपींना बेड्या!| Marathi News.

News@Crime...

   Chandrapur : जिल्ह्यातील भिसी पोलीस स्टेशन येथे 19 जानेवारी रोजी 'सौ.गिता ज्ञानेश्वर मेश्राम,यांनी तक्रार दिली होती की,माझा मुलगा बादल ज्ञानेश्वर मेश्राम वयवर्ष 22,हा 17 जानेवारी रोजी अंदाजे 10,45वा.उमरेड येथे सर्व्हिसिंगला टाकलेली गाडी घेऊन येतो,असे सांगून घरून गेला.परंतु,तो घरी परत आला नाही.' या तक्रारीवरून मिसिंग रिपोर्ट दाखल करण्यात आली.सदर प्रकरणात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे पथक व भिसी पोलिसांनी गोपनीय बातमीदार नेमून व सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक पद्धतीने तपास करून बेपत्ता असलेल्या युवकांची हत्या व पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले.

      देवानंद गोवर्धन श्रीरामे वयवर्ष 40 रा.मिनझरी,आरीफ उस्मान खान पठाण वयवर्ष 32 रा.नेताजी वार्ड चिमूर(ह.मु. मिनझरी)व सौलभ सुभाष चौधरी वयवर्ष 22 रा.मिनझरी, असे आरोपींची नावे असून यांनी संगनमताने बादल मेश्रामला  "आवडणारी मुलगी तुला भेटेल" असे वशीकरणाची बाब सांगून,त्याला एका आरोपीच्या शेतात मुरमार मिनझरी जंगल शिवारात नेवून नॉयलोनच्या दोरीने गळा आवळून ठार केले.जंगलातील नाल्यात खड्डा खोदून प्रेत पुरून पुरावे नष्ट केले आणि मृतकाची बाईक,मोबाईल इतरत्र ठिकाणी टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,चिमूर उपविपोअ. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात भिसीचे ठाणेदार सपोनि. मंगेश भोंगडे,सपोनि.बलराम झाडोकार,पोउपनि.रविंद्र वाघ पोउपनि.भारत थिटे,पोउपनि.सर्वेश बेलसरे,पोहवा.नितीन साळवे,पोअं.अमोल सावे,प्रसाद धुलगुंडे,हिरालाल गुप्ता, सतिश झिलपे,मंगेश चौधरी पोस्टे भिसी,स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी केली आहे.

#Murder Case. #Chandrapur District Crime News.

                         "$$$$$$$$$$$$$$$$$$$$"