Korpana :पंचायत समिती गट साधन केंद्र(शिक्षण विभाग) कार्यालय येथे चोरीची घटना समोर आली आहे.सदर घटना 24 जानेवारी शनिवार रोजी घडल्याचे कळते.लोखंडी ग्रिल असलेल्या सदर कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची कुंडी तोडून चोरटे कार्यालयात शिरले.तेथील कपाटातील 3 शासकीय लेपटॉप आणि डाटा अपडेट करणारे प्रविण ईसनकर,यांचा 1 वैयक्तिक लेपटॉप,असे 4 लेपटॉप किंमत अंदाजे 1लाख,83 हजारांच्या लेपटॉपासह ईसनकर यांचे चेकबुक घेऊन चोरटे लंपास झाले आहे.कार्यालयातील टेबलचे ड्राफ तोडून त्यातील कागदपत्रे अस्ताव्यस्त केले आहेत.
कोरपना पोलीस स्टेशन येथे 25 जानेवारी रोजी घटनेची तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. कोरपनाचे ठाणेदार लता वाढीवे यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आली असून सदर घटनेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
#Crime News. #Korpana Panchayat Samiti.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
