Gadchandur : येथे श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. 20 जानेवारी रोजी नामांकन प्रक्रिया व बिनविरोध निवड जाहीरनामा नामांकन भरण्याची शेवटची तारीख होती. एकूण 5 नामांकन अर्ज प्राप्त झाले.सदर नामांकन प्रक्रिये दरम्यान कोणत्याही पदासाठी कोणाचाही विरोध अथवा हरकत प्राप्त झाली नाही.त्यामुळे पंच कमिटीच्या सर्वानुमते व निर्णयाने सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
'अशी आहे कार्यकारिणी.'
अध्यक्ष श्री.गिरीश लिखितराव कामाडी,उपाध्यक्ष श्री.बंडू संभाजी रागीट,सचिव श्री.विक्की आनंद रामचंद्र पोटदुखे,सहसचिव श्री.मयुर सुधाकर पोटदुखे,कोषाध्यक्ष श्री.सचिन रामकृष्ण बावनकर,यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
ही संपूर्ण प्रक्रिया पंच कमिटी सदस्य नागपुरे सर,करंबे सर,बेले सर,यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनात पार पडली.उपस्थित पंच कमिटी व समाज बांधवांनी सर्व नवनिर्वाचितांचे स्वागत व अभिनंदन केले.सदर निवड प्रक्रिया पारदर्शक,लोकशाही पद्धतीने व सर्वांच्या संमतीने पार पडली.
#The executive committee of Shri Santaji Jagnade Maharaj Multipurpose Organization has been formed.
'&&&&&&&&&&&&&&&&&&&&&'
