Rajura : शहरातील बामणवाडा येथील 'नक्षत्र हॉल' येथे सुरू असलेल्या जुगारावर राजुरा पोलिसांनी धाड टाकून 20 जणांना रंगेहात पकडले.या कारवाईत रोख रकमेसह 12 मोबाईल फोन आणि ताशाचे पत्ते,असा एकूण 2 लाख 93 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि.31ऑक्टोबर 2026 रोजी रात्रीच्या सुमारास राजुरा पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग करीत असताना बामणवाडी रोडवरील 'नक्षत्र हॉल' येथे जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे नाईट डी.ओ.व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाड टाकली.यावेळी हॉलमध्ये टेबलाभोवती बसून 20 जण 52 ताशांच्या पत्त्यांवर हार-जीतचा जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी कारवाईदरम्यान संबंधितांची अंगझडती व जुगाराच्या डावावरील साहित्याची तपासणी केली असता,रोख रक्कम 58 हजार 300 रुपये,12 मोबाईल फोन किंमत अंदाजे 2 लाख 35 हजार रुपये आणि ताशांच्या पत्त्यांचे 6 सेट किंमत 300 रुपये, असा एकूण 2 लाख 93 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईतील आरोपींची नावे :
1) गोपाल नारयण झवर.
2) दिनेश कुष्णजी आकनूरवार.
3) अशोक छबलदार चैन्नानी.
4) बंडु मारोती जयपुरकर.
5) दिपक मुलीधर मंगरुळकर.
6) सुशील मदनलाल चांडक.
7) सावंत अकलू बोडोवार.
8) मारोती नामदेव चिंचोळकर.
9) शरद मुर्लीधर मंगरुळकर.
10) अक्षय गजानन काशेट्टीवार.
11) किशोर दत्तात्रय हिंगाने.
12) राजु वंसतराव साईनवार.
13) राजेश मोहनलाल बजाज.
14) उमेश केशवराव कोडावार.
15) अशोक अंबाराम ठक्कर.
16) निलकंठ दत्तुजी पचारे.
17) विशाल अमुतलाल जैस्वाल.
18) दिलीप श्यासुदंर वांडरे.
19) जुबेर अन्सार हनफी.
20) नरेंद्र भिवाजी काकडे,सर्व राजुरा येथील रहिवासी आहेत.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या पथकात सपोनि.योगेश पाटील,सफौ.राजनारायण ठाकूर,पोलीस अंमलदार आकाश पिपरे व राजीव दुबे यांचा सहभाग होता.
#Police Raid on Gambling.#Rajura Crime News.

