Gadchandur : गडचांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे २७ आक्टोबर रोजी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत १ किलो ९३ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.या प्रकरणी एका ५१ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ५४ हजार ६५० रुपये आहे.
जंगू मारोती कुंभरे (वय ५१,रा.बैलमपूर,ता.राजुरा,जि.चंद्रपूर), असे आरोपीचे नाव आहे.या प्रकरणी गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०८/२०२६ अन्वये NDPS कायद्याच्या कलम ८(क) व २०(ब)(II)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूरचे ठाणेदार प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज हेकाड, नापोअं. बलवंत शर्मा,पोलीस अंमलदार सुरज ढोले,प्रकाश बाजगीर, साईनाथ उपरे,मनोहर जाधव,पराग राजूरकर आणि महिला पोलीस अंमलदार कविता पळनाटे यांनी सहभाग घेतला.
#Gadchandur Police Action. #Crime News #Narcotic Drugs and Psychotropic Substances Act,1985.

