Korpana : तालुक्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर येथील 'जे-पॅलेस' बार अँड रेस्टॉरंटवर पोलिसांनी धाड टाकून 12 जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडले.या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह एकूण 5 लाख 75 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार,दिनांक 1 नोव्हेंबर 2026 रोजी गडचांदूर पोलिसांना गडचांदूर-कोरपना मार्गावरील महामार्गालगत असलेल्या 'जे-पॅलेस' बारमध्ये 52 ताशांच्या पत्त्यांवर कटपत्ता जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांच्या नेतृत्वात राजुरा व गडचांदूर पोलीस स्टेशनच्या पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत सदर ठिकाणी छापा टाकला.यावेळी जुगार खेळण्यात व्यस्त असलेले 12 इसम पोलिसांच्या हाती लागले.
'पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे' :
1) शरद सुरेश जोगी (वय 44),रा.गडचांदूर.
2) अशोक तुकाराम बोधे (वय 44),रा.गडचांदूर.
3) मदन रघुजी बोरकर (वय 62),रा.गडचांदूर.
4) स्वप्नील भीमनाथ बोथले,रा.नांदगाव सूर्या.
5) जुनेत महेबुब शेख,रा.गडचांदूर.
6) महेशचंद कजोडीराम मिना (वय 38),रा.गडचांदूर.
7) महेश रामकृष्ण पिंपळकर (वय 43),रा.वनसडी.
8) शारूखान गफार खान (वय 30),रा.गडचांदूर.
9) गुलाब एकरूप राठोड (वय 45),रा.गडचांदूर.
10) स्नेहल अशोक उईके (वय 30),रा.सोनुर्ली.
11) संदिप महादेव पाचबाई वय 45 रा.गडचांदूर.
12) विनोद मनोहर काकडे (वय 35),रा.सोनुर्ली,सर्व आरोपी तालुका कोरपना,जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत.या कारवाईत एकूण 5 लाख 75 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये अप. क्रं.522/2026,कलम 4 व 5 महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल :
1) एकुण 14 नग मोबाईल किं.अं.1 लाख,80 हजार.
2) एकुण तीन मोटारसायकल किं.अं.2 लाख.
3) एकुण 12 आरोपींच्या अंगझडतीत मिळालेले 1 लाख, 36 हजार, 200 रू.
4) डावावरील रोख रक्कम 44 हजार 70 रू.
5) स्टीलच्या डब्यामधील 14 हजार 500 रू.
6) स्टीलच्या डब्याची किंमत 100 रुपये,असे एकूण 5 लाख,75 हजार,170 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा कुमार सुशांत यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या पथकात राजुरा पोलीस स्टेशनचे एपीआय लक्ष्मण लोकरे, सफौ.किशोर तुमराम, पोहवा.अनुप डांगे, पोहवा.विक्की निर्वाण, पोअं.राजीव दुबे,तसेच गडचांदूर पोलीस स्टेशनचे पीएसआय गणेश अनभुले,प्रकाश बाजगीर,श्रीनिवास सोडणार,पराग राजूरकर व बंडू मातने यांचा समावेश होता.
गडचांदूरमधील या बारमध्ये सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी एका आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई केली असून या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगाराचे अड्डे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
#Police Raid on Gambling.#Police Raid on Gambling. #Gachandur Crime News.

