Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB) चंद्रपूरच्या पथकाने वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील पारधी टोला,चिनोरा परिसरात जुगार अड्ड्यावर धाड टाकून 6 जणांना रंगेहात पकडले.या कारवाईत 35 हजार 100 रुपये रोख रक्कम आणि 52 ताशपत्ते जप्त करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 1 नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करीत असताना,वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील पारधी टोला,चिनोरा परिसरात विकास काळे नामक व्यक्तिच्या राहत्या घरी काही इसम 52 ताशपत्त्यांवर जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी विकास काळे यांच्या घरी सापळा रचून छापा टाकला.यावेळी जुगार खेळताना 6 जण आढळून आले.
'ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे' :
1) राजू शेंडे
2) विकास काळे
3) कैलास घुमे
4) आशीष ढोक
5) उमेश येटे
6) निखील दानव.
पोलिसांनी आरोपींकडून 35 हजार 100 रुपये रोख रक्कम आणि 52 ताशपत्ते,असा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई' :
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सपोनि.बलराम झाडोकार,पोउपनि.संतोष निभोरकर, पोउपनि.सर्वेश बेलसरे,पोहवा.प्रफुल गारघाटे,पोहवा. रजनीकांत पुठ्ठावार,पोहवा.सचिन गुरनुले,पोहवा.सुभाष गोहोकार,पोअं. सुमित बरडे,पोअं.विठ्ठल काकडे,पोशि.मिलिंद टेकाम व पोशि. दिनेश अराडे यांचा समावेश होता.
#Raid on Gambling. #Action by LCB Chandrapur. #Crime News.

