Chandrapur : वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या कापूस चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा(LCB)ने यशस्वी तपास करीत उलगडा केला आहे.या प्रकरणात 2 आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचा कापूस आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल झायलो कार,असा एकूण 5 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरोरा पोलीस स्टेशन येथे अप.क्रं.1067/2026,कलम 303(2), भारतीय न्याय संहिता अन्वये कापूस चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असताना 1 नोव्हेंबर 3026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा(LCB), चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदाकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे सागर लक्ष्मण चव्हाण(वय 29 रा.नागरी, ता.वरोरा,जि.चंद्रपूर),अमोल महादेव जाधव(वय 22,रा.दहेगाव, सेलू,ह.मु.हिंगणघाट,जि.वर्धा) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून चोरी केलेल्या कापसापैकी 2.5 क्विंटल कापूस,किं. अं.23 हजार रुपये,तसेच कापूस चोरीसाठी वापरण्यात आलेली झायलो कंपनीची कार,किं.अं.5 लाख,असा एकूण 5 लाख,23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
'पोलीस पथकाची कारवाई' :
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर,पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे,पोलीस हवालदार रजनीकांत पुठ्ठावार,सचिन गुरनुले,सुभाष गोहोकार, पोलीस अंमलदार विठ्ठल काकडे व पोलीस शिपाई दिनेश अराडे यांनी सहभाग घेतला.
#Chandrapur District Crime #Action by LCB Chandrapur.

