"BJP to Shetkari Sanghatana" : महिनाभरातच भाजपला रामराम! सुभाष व ईश्वर तुराणकर यांची शेतकरी संघटनेत घरवापसी!|Marathi News.

News@Politics...

Korpana : राजकीय पक्षांमधील बदलत्या घडामोडींचा प्रत्यय कोरपना तालुक्यात पुन्हा एकदा आला आहे.अवघ्या महिना भरापूर्वी म्हणजेच 3 ऑक्टोबर 2026 रोजी भाजपमध्ये प्रवेश केलेले शेतकरी संघटनेचे सुभाष तुराणकर व ईश्वर तुराणकर यांनी 3 नोव्हेंबर रोजी भाजपला रामराम ठोकत पुन्हा शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे.माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी संघटनेत घरवापसी केली.

गेल्या 3 ऑक्टोबर रोजी कोरपना येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित छोटेखानी पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार देवराव(दादा)भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाष तुराणकर व ईश्वर तुराणकर,यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता.मात्र, महिनाभराचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत पुन्हा शेतकरी संघटनेची वाट धरली.

“भाजपचे धोरण शेतकरीविरोधी असून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा या धोरणाबाबत तीव्र नाराजी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.त्यामुळे ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेतकरी संघटनेत पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.”

3 नोव्हेंबर रोजी कोरपना येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील नवले,तालुकाध्यक्ष ॲड.श्रीनिवास मुसळे,संघटनेचे ज्येष्ठ नेते डॉ.मुसळे,श्रीमती रमा पाटील मालेकर,अनंता गोडे,अविनाश मुसळे,नादिर कादरी,शारीक अली,संदीप टोंगे,गणेश तुराणकर, गणपत गोडे,प्रवीण रासपल्ले,सौरभ राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने सुभाष तुराणकर व ईश्वर तुराणकर यांनी शेतकरी संघटनेत पुन्हा प्रवेश केला.त्यांच्या या घरवापसीने कोरपना परिसरात शेतकरी संघटनेला संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून,या राजकीय घडामोडीमुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

#Exits BJP to rejoin Shetkari Sanghatana. #Political News.

                              ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢