Crime News : कोरपना पोलिसांची वाहन चोरीविरोधात कारवाई; दोन आरोपी ताब्यात,पल्सर दुचाकी जप्त!| Marathi News.

News@Bike thief...

         Korpana : पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई 30 ऑक्टोबर रोजी परसोडा फाटा परिसरात करण्यात आली.

महेश सुरेश पोतुकलवार आणि आशिष ऊर्फ ऋतिक जानकीराम चौधरी,अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून पल्सर NS 160 (क्रं.MH/34/BJ/4733),ही दुचाकी जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी कोरपना पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद रहांगडाले यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या पथकात पोलीस उपनिरीक्षक जाधव,पोलीस हवालदार राकेश वाकूलकर,नामदेव पवार व जितेंद्र राजुरकर यांचा समावेश होता.

कोरपना पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर ठाणेदार  विनोद रहांगडाले यांनी गुन्हेगारीविरोधात कारवाईचा धडाका सुरू केल्याचे दिसून येत आहे.वाहनचोरीच्या प्रकरणात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

'नागरिकांना पोलिसांचे आवाहन' :

परिसरात वाहनचोरांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही.नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत,वाहनांच्या सुरक्षेसाठी योग्य लॉकचा वापर करावा तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन कोरपना पोलिसांनी केले आहे.

#Bike thief Case #Korpana Police Action #Crime news.

                      ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢