Chandrapur : दिनांक २९/०४/२०२१ रोजी सकाळी १९/१५ ते २०/०० वाजेच्या सुमारास यातील फिर्यादी ही चारचाकी वाहनावर आरोपीसह फिर्यादीचे गावी वाढवणा येथे जात असताना खैरी येथून वाढवणा येथे न जाता माढेळी मार्गे नागरी माढेळी चे २ ते ३ किलोमीटर अतंरावर वाहन घेवून जावून तिला धमकी देवून मारहाण करून तिचेवर लैंगीक अत्याचार केला.(Sexual Assault),अशा फिर्यादीचा रिपोर्ट वरून पोलीस ठाणे वरोरा येथे तत्परतेने गुन्हा रजीस्टर क्र.३५३/२०२१ कमल ३७६,३७६ (२) (एन) (इ), ३२३,५०६ भादवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले.गुन्ह्याचा सखोल तपास करून तपासी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार,वैद्यकीय अहवाल व परिस्थतीजन्य पुरावे गोळा करून मा.न्यायालयात वेळेत दोषारोपत्र दाखल केले.
'मा.न्यायालयचा निकाल' :
सदर खटल्याची सुनावणी मा.श्री.अतुल के.शहा अतिरीक्त सत्र न्यायालय वरोरा,जिल्हा चंद्रपूर येथे झाली.सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्त गोवींद उराडे यांनी मांडण्यात आलेला युक्तीवाद व सादर केलेले साक्ष पुरावे मा. न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीस दिनांक २९/१०/२०२६ रोजी कलम ३७६ (२) (एन) भादवी मध्ये जन्मठेपेची शिक्षा व ५००० रू दंड.दंड न भरल्यास ३ महिन्यांचा साधा कारावास तसेच ३७६ भादवी मध्ये ७ वर्षाची शिक्षा व ४००० रू.दंडाची शिक्षा,कलम ३२३ भादवी मध्ये १ वर्षाची शिक्षा व १००० रू दंड,कलम ५०६ भादवी मध्ये १ वर्षाची शिक्षा व १००० रू दंडाची शिक्षा देण्यात आली.
'तपास,मार्गदर्शक व न्यायालयीन पैरवी अधिकारी :
० तपासी अधिकारी महीला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव पोलीस स्टेशन वरोरा.
० सरकारी अभियोक्ता ॲड.गोवींद उराडे.
० कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार धनराज करकाडे ब.नं.२०४० पोलीस स्टेशन वरोरा.
० दोषसिध्दी कक्ष,चंद्रपूर.
सदरची कामगीरी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष्य नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.
#Janmathep. #Crime News.

