Chandrapur : पोंभुर्णा पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा (LCB),चंद्रपूर आणि पोंभुर्णा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत 4 संशयितांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून अंदाजे 50 हजार रुपये किमतीची चोरीची कटर मशीन जप्त करण्यात आली.
पोंभुर्णा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 184/2026,कलम 303(2)BNS अन्वये गुन्हा दाखल आहे.दिनांक 27 ऑक्टोबर रोजी आरोपी व चोरीच्या मुद्देमालाचा शोध घेत असताना पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली.यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
'ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे' :
1: प्रमोद श्रीनिवास तोरे (वय 30),रा.चिंतलधाबा,ता.पोंभुर्णा.
2 : चंद्रशेखर विठ्ठल कुळमेथे(वय 36),रा.केमारा,ता.पोंभुर्णा.
3 : राजकुमार घुंगरू मरसकोल्हे(वय 36),रा.पोंभुर्णा.
4 : सचिन दामोदर पेंदोर(वय 38),रा.पोंभुर्णा.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर व पोंभुर्णा पोलीस पथकाने केली आहे.
#Chandrapur District Crime News.

