Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूरच्या वरोरा पथकाने चंद्रपूर शहरातील वेकोलि पंखा परिसर मूल रोड,येथे कारवाई करत दुचाकी चोरीच्या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेली बजाज पल्सर मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड,असा एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दि.18 ऑक्टोबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे वरोरा पथक चंद्रपूर शहरात पेट्रोलिंग करीत असताना ही कारवाई करण्यात आली.
'ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे' :
1. लॉरेंसे उर्फ इशू जॉर्ज दास (वय 21)रा.सरदार पटेल वार्ड, बल्लारपूर.
2. निखील उर्फ बिसलरी रामराकेश निषाद (वय 19) रा. भगतसिंग वार्ड,बल्लारपूर.
'जप्त केलेला मुद्देमाल' :
1. बजाज पल्सर NS 125 मोटारसायकल (क्र.MH-34-CF-3993,किं.अं.75 हजार रुपये.
2. गुन्ह्यात वापरलेली मोपेड (क्र.MH-34-CU-1282,किं.अं.50 हजार रुपये.
अशा प्रकारे एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणातील लवकुश उर्फ डू उमेश निषाद (वय 24,रा.भगतसिंग वार्ड,बल्लारपूर),हा आरोपी पाहिजे असून, त्याचा शोध सुरू आहे.
'वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई' :
जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात उपविभाग वरोरा आणि स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूरच्या पथकाने ही कारवाई केली.
#Chandrapur District Crime News. #LCB Chandrapur Action.

