Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात 4 वर्षीय बालक जखमी; चांदगावात भीतीचे वातावरण!|Marathi News.

News@Shicking...

Chandrapur : जिल्ह्यातील तालुका ब्रह्मपुरी तेथील चांदगाव,येथे 27 आक्टोबर मंगळवार रोजी सायंकाळी जवळपास 6.30च्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात 4 वर्षीय मयंक वलके,हा बालक जखमी झाला.त्याच्यावर ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,बालक आत्याच्या घराच्या पायरीजवळ पोहोचताच वाघाने त्याच्यावर झडप घातली.सोबत असलेल्या रोहित वलके यांनी आरडाओरड केल्याने वाघाने घटनास्थळा वरून पळ काढला.त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच परिसरात वाघाने शेळीवर हल्ला केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.सलग घडणाऱ्या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून,वनविभागाने गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी होत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरएफओ कन्नमवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी बालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली.

#4-year-old child injured in tiger attack in Brahmapuri. #Shocking News.

                          ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢