Traffic Policeच्या प्रामाणिकपणाचे कौतुक|Marathi News.

News@Traffic Police....

Chandrapur : कर्तव्य बजावताना रस्त्यावर पडलेली १५ हजार रुपयांची रोख रक्कम संबंधित व्यापाऱ्याला प्रामाणिकपणे परत करणाऱ्या वाहतूक पोलीस हवालदाराच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर, येथे कार्यरत पोलीस हवालदार 'सुभाष जाधव' (ब.नं.१९४९),हे शहरातील कस्तुरबा चौक सिग्नल पॉईंटवर वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते.यावेळी नागपूर येथील एक व्यापारी ऑटोने प्रवास करत असताना त्यांच्या पिशवीतून १५ हजार रुपयांची रोख रक्कम कस्तुरबा चौक सिग्नलजवळील रस्त्यावर पडली.

ही बाब कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार सुभाष जाधव, यांच्या तत्काळ निदर्शनास आली.त्यांनी प्रसंगाधान राखत संबंधित ऑटो थांबविला.त्यानंतर पडलेली रक्कम आणि व्यापाऱ्याची ओळख,याबाबत आवश्यक ती शहानिशा करून खात्री केली.खात्री पटल्यानंतर माजी नगरसेवक रामु तिवारी यांच्या उपस्थितीत सदर १५ हजार रुपयांची रोख रक्कम संबंधित व्यापाऱ्यास सुखरूप परत करण्यात आली.

पोलीस हवालदार सुभाष जाधवांनी दाखविलेला प्रामाणिकपणा सतर्कता आणि कर्तव्यदक्षता कौतुकास्पद ठरली आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपस्थित नागरिकांसह पोलीस प्रशासनाकडूनही त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

#Chandrapur Traffic Police.

                              ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢