Korpana : गडचांदूर-भोयगाव मार्गावर मंगळवारी (२५ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.वैभव गोहणे (वय अंदाजे २५,रा. भोयगाव),असे जखमी तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे. त्याच्यावर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. Bike Accident.
मिळालेल्या माहितीनुसार,वैभव गोहणे हा २५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास दुचाकी क्रमांक MH-34-CE-6055 ने कवठाळा येथून भोयगावकडे जात होता.दरम्यान,गडचांदूर-भोयगाव मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ त्याचा अपघात झाला.या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.तो बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याचे आढळून आले. Bike Accident.
काही वेळानंतर या मार्गाने जाणाऱ्या एका व्यक्तीच्या निदर्शनास ही घटना आली.त्याने वैभवला ओळखून त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले.वैभवला उपचारासाठी गडचांदूर येथील रुग्णालयात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्यात आला. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली; मात्र ती बंद पडल्याने वैभवला तातडीने चंद्रपूर येथे हलविण्यात आले.कुटुंबीयांनी एका चारचाकी वाहनातून त्याला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.बातमी लिहेपर्यंत वैभव बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती आहे.
दरम्यान,वैभवच्या दुचाकीला मागून ट्रकने धडक दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.मात्र,अपघात नेमका कसा झाला,याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.वैभव शुद्धीवर आल्यानंतरच या अपघाताची खरी हकीकत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.पोलिसांच्या तपासानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.
#Bike accident.#Two-wheeler accident on Gadchandur-Bhoygaon road.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
