Gadchandur petrol pump theft case : कर्मचारी झोपले अन् चोरट्याची पेट्रोल पंपावर एन्ट्री; 1 लाख 2 हजारांची रोकड घेऊन पोबारा!| Marathi News.

News@Petrol Pump Theft...

        Korpana : तालुक्यात औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहरातील पेट्रोल पंप(राजीव गांधी)चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरीची घटना समोर आली आहे.कर्मचारी कॅबिनमध्ये झोपलेले असताना चोरट्याने खिडकीतून आत प्रवेश करून ड्रॉवर मधील तब्बल 1 लाख 2 हजार रुपये लंपास केले.चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून,पोलिसांनी आरोपी निष्पन्न केल्याची माहिती आहे.

23 ऑगस्ट 2026 रोजी दिवसभराचे काम आटोपल्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचारी कॅबिनमध्ये झोपले होते.याच संधीचा फायदा घेत मध्यरात्री (24ऑगस्ट)चोरट्याने खिडकीतून कॅबिनमध्ये प्रवेश केला.त्यानंतर ड्रॉवर मधील 1 लाख 2 हजार रुपयांची रोकड घेऊन त्याच मार्गाने तो पसार झाला.हे घडत असताना त्याठिकाणी झोपलेल्या 3 कर्मचाऱ्यांपैकी एकालाही जाग न येणे! आश्चर्यकारक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

              24ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्यामध्ये चोरी करणारा संशयित स्पष्टपणे कैद झाला असून,सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले असून,फरार आरोपीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.लवकरच आरोपीला गजाआड करण्यात येईल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहेत.

   दरम्यान,पेट्रोल पंपावर झालेल्या या धाडसी चोरीमुळे गडचांदूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी शहरातील रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

#Gadchandur petrol pump theft case. #Chandrapur Crime News.

                        ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢