Crime News : CSTPS परिसरातील कॉपर केबल चोरीचा पर्दाफाश; ६ क्विंटल कॉपर वायर व ट्रकसह ₹२२.२० लाखांचा मुद्देमाल जप्त,१० आरोपी ताब्यात!|Marathi News.

News@Crime...

Chandrapur : महाऔष्णिक विद्युत केंद्र (CSTPS) परिसरातून कॉपर केबल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी दुर्गापूर पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते.

गोपनीय माहितीच्या आधारे १८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे दुर्गापूर पोलिसांनी कारवाई केली.या कारवाईत सुमारे ६ क्विंटल कॉपर वायर,अंदाजे ₹७ लाख २० हजार किमतीची,तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेला अंदाजे ₹१५ लाख किमतीचा ट्रक असा एकूण ₹२२ लाख २० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत एकूण १० आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेच प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

गुन्हा दाखल :

या प्रकरणी फिर्यादी सहदेव कैलास नारनवरे,वय ४० वर्षे,रा. वसाहत ऊर्जानगर,ता.जि.चंद्रपूर,यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे दुर्गापूर येथे गुन्हा रजि.क्र. ०३९८/२०२६,कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS),२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात दुर्गापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या नेतृत्वात दुर्गापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोउपनि.संदीप बच्छीरे,पोहवा. राजु गोखरे,पोअं.संदीप जाधव,सोनल खोब्रागडे,स्विखील उराडे व कोमल मोहजे यांनी केली.

#Chandrapur District Crime News.

                       ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢