Chandrapur Crime News : विदेशी दारू तस्करीवर LCBचा दणका; Ford EcoSportसह ₹७.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त,दोघांना अटक, एक फरार!|Marathi News.

News@Crime...

            Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरेड-भिसी मार्गावरील जेबी हॉटेलजवळ अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून ₹७ लाख ५१ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून,एका आरोपीचा शोध सुरू आहे.

दि.१८ सप्टेंबर २०२६ रोजी LCB पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.कारवाईदरम्यान २१९ नग रॉयल स्टॅग क्लासिक व्हिस्कीच्या २ लिटर क्षमतेच्या बाटल्या,किंमत ₹२ लाख ५१ हजार ८५०,तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली Ford EcoSport कार (क्रमांक GJ-15-CD-3292),अंदाजे किंमत ₹५ लाख,असा एकूण ₹७ लाख ५१ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मुकेश उर्फ मोनु मदनलाल विश्वकर्मा(वय ३१,रा. समतानगर,आंबेडकर बगीचा समोर,वर्धा)आणि आदर्श अशोक पाटील(वय २२,रा.तुकडोजी वार्ड,हिंगणघाट,जि.वर्धा) यांना आरोपी करण्यात आले आहे.तर प्रशांत(रा.अहेरी,जि.गडचिरोली) हा पाहिजे आरोपी असून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन भिसी येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ),८३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पथकाने केली.

#Chandrapur Crime News. #Action by LCB Chandrapur.

                                ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢