Chandpur Police station : गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर;!| Marathi News.

News@Police...

         Chandrapur : आगामी गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका जिल्ह्यात शांततेत,सुरक्षित वातावरणात आणि कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही भंग न होता पार पडाव्यात,यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने सराईत गुन्हेगार व समाजकंटकांविरुद्ध व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम राबविली आहे.

          नागरिकांना सुरक्षित वातावरणात सण साजरा करता यावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

                'प्रतिबंधात्मक कारवाईचा सविस्तर तपशील.'

६१५ सराईत गुन्हेगारांवर कारवाई :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS)कलम १२६ व १२९ अंतर्गत शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या तब्बल ६१५ सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.संबंधितांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले आहे.

३९ गुन्हेगार तडीपार :

जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या ३९ सराईत गुन्हेगारांना कायदेशीर प्रक्रियेद्वारे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

१,७६१ जणांवर मिनी तडीपारची कारवाई :

उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याची शक्यता असलेल्या १,७६१ संशयित इसमांविरुद्ध BNSS कलम १६३ (२) अन्वये प्रतिबंधात्मक मिनी तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.

२ कुख्यात गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत स्थानबद्धता :

वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या तसेच समाजात दहशत निर्माण करणाऱ्या २ कुख्यात गुन्हेगारांवर MPDA Act अंतर्गत कारवाई करून त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

तडीपार गुन्हेगारांवर AI CCTV ची नजर :

चंद्रपूर पोलीस दलाच्या अत्याधुनिक AI Surveillance CCTV Camera Van प्रणालीमध्ये हद्दपार व तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांचे फोटो,चेहरे (Face Recognition)तसेच आवश्यक माहिती नोंदविण्यात आली आहे.

हद्दपारीचा कालावधी सुरू असताना कोणताही तडीपार गुन्हेगार विनापरवाना चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करताना किंवा फिरताना आढळल्यास,AI Surveillance CCTV प्रणालीच्या माध्यमातून त्याची ओळख पटवून अलर्ट देण्यात येणार आहे.

हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या संबंधित गुन्हेगारांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कठोर दंडात्मक व कारावासाची कारवाई करण्यात येईल,असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

'शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन'

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अप्रिय घटना घडू नये,यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे.नागरिकांनी उत्सव शांततेत,नियमांचे पालन करून,ते पारंपरिक पद्धतीने उत्साहात व भक्तिभावाने साजरा करावा.

तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

#Chandrapur District police News.

                     ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢