Ratnagiri : चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना 22 ऑगस्ट रोजी घडली. वाशिष्ठी नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईवर मगरीने अचानकपणे हल्ला केला.मगर आईला पाण्यात ओढून नेत असताना अवघ्या 10 वर्षांच्या मुलीने प्रसंगावधान राखत धाडसाने मगरीशी दोन हात केले आणि आईला पाण्यातून बाहेर ओढून तिचा जीव वाचवला.स्वर्णी पवार,या चिमुकलीच्या धाडसाचे संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कौतुक होत आहे.
नंदिनी पवार या वाशिष्ठी नदीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक मगरीने त्यांच्यावर हल्ला केला.मगरीने नंदिनी यांचा पाय पकडून त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. अचानक आलेल्या या संकटामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.मात्र,आईवर झालेला मगरीचा हल्ला पाहून स्वर्णी घाबरली नाही.तिने प्रसंगावधान राखत आईला वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले.स्वर्णीने आईला बाहेर ओढल्याने नंदिनी पवार यांचा जीव वाचला.या मगरीच्या हल्ल्यात नंदीनी पवार जखमी झाल्या असून,त्यांच्यावर कामथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान,अवघ्या 10 वर्षांच्या स्वर्णीने दाखवलेल्या धाडसामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.वाशिष्ठी नदी परिसरात यापूर्वीही मगरींचा वावर आढळून आला आहे.त्यामुळे या घटनेनंतर नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने नदीकाठच्या परिसरात तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी होत आहे.
"आईचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता धाडस दाखवणाऱ्या स्वर्णी पवारच्या प्रसंगावधानाने ‘आईसाठी मुलगीच बनली ढाल’ याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे.
#Shocking News. #Daughter’s Brave Fight with Crocodile. #Vashishti River Crocodile Attack # Nandini Pawar
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
