Sugar Hoarding Crisis : सणासुदीत साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; आता....|Marathi News.

News@Sugar....

Sugar Hoarding Crisis : सणासुदीच्या काळात साखरेची वाढती मागणी आणि संभाव्य साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या साखर खरेदीदारांवर कडक निर्बंध लागू केले आहेत.1सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखर वापरणाऱ्या व्यापारी, व्यावसायिक आणि संस्थांना आता त्यांच्या 15 दिवसांच्या गरजे पेक्षा अधिक साठा करता येणार नाही.

मिठाई,बेकरी,बिस्किट,कन्फेक्शनरी,शीतपेय तसेच खाद्यप्रक्रिया उद्योगातील मोठ्या ग्राहकांना या निर्णयाचा थेट फटका बसणार आहे.यापूर्वी अशा ग्राहकांना 30दिवसांच्या गरजे इतका साखरेचा साठा ठेवण्याची मुभा होती.मात्र,साखरेच्या वाढत्या किमती आणि गणेश चतुर्थी,दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही मर्यादा आता निम्म्यावर आणण्यात आली आहे.

खरेदी-वापराच्या आकडेवारीवर सरकारची नजर :

साखरेची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारकडून खरेदी आणि वापराच्या आकडेवारीची छाननी केली जाणार आहे.साखर कारखान्यां कडून झालेली विक्री आणि संबंधित व्यावसायिकांच्या वस्तू व सेवा कर (GST)विवरणपत्रातील माहितीचा मेळ घातला जाणार आहे.

यामध्ये साखरेचा संबंधित HSN क्रमांक,खरेदीचे प्रमाण,प्रत्यक्ष वापर आणि शिल्लक साठा यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे सणासुदीपूर्वी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करून तिची साठवणूक करणाऱ्या व्यावसायिकांवर सरकारची थेट नजर राहणार आहे.

15 दिवसांपेक्षा अधिक साठा ठेवता येणार नाही :

1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 या काळात दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखर वापरणाऱ्या ग्राहकांना केवळ 15 दिवसांच्या गरजेइतकाच साठा ठेवता येईल.यापूर्वी ही मर्यादा 30 दिवसांची होती.सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा आणि कृत्रिम टंचाई अथवा दरवाढ रोखता यावी,हा या निर्बंधा मागील प्रमुख उद्देश आहे.

#Sugar Hoarding Crisis.#Marathi News.

                               ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢