Chandrapur : अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यां विरोधात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)धडक कारवाई केली.गोपनीय माहितीच्या आधारे दि.20ऑगस्ट 2026 रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत 12 ब्रास रेतीसह सुमारे 40 लाख रुपये किमतीचा 16 चक्का ट्रक असा एकूण 40 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.त्यानुसार पथकाने छापा टाकून महेंद्र कंपनीचा 16 चक्का पल्ला गाडी क्रमांक MH-40-CT-4133 ताब्यात घेतला.या वाहनातून 12 ब्रास रेती,अंदाजे 60 हजार रुपये किमतीची आढळून आली.
या प्रकरणी चालक शरद पुंजराम शेंद्रे(वय 39,रा.तादेगाव ठाकूर, ता.तिवसा,जि.अमरावती)आणि सिद्धार्थ विनायकराव गडलिंग (वय 33,रा.परतोडा,ता.आर्वी,जि.वर्धा)यांना आरोपी करण्यात आले आहे.तर वाहन मालक समरजीत दर्शनसिंग गरेवाल (रा.गुरुकुंज मोजरी,ता.तिवसा,जि.अमरावती),हा पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम 303(2),भारतीय न्याय संहिता (BNS)तसेच जमीन महसूल कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल :
• महेंद्र कंपनीचा 16 चक्का पल्ला गाडी क्र.MH-40-CT-4133,अंदाजे किंमत 40 लाख रुपये.
• 12 ब्रास रेती,अंदाजे किंमत 60 हजार रुपये.
• एकूण जप्त मुद्देमाल :
40 लाख 60 हजार रुपये.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा व उपविभाग राजुरा यांच्या पथकाने केली.
#Sand smuggling. #Local Crime Branch action against sand smuggling.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
