"Drug-Free Youth India Campaign" : नशामुक्त युवा भारत अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 203 शाळा-महाविद्यालयांतील 75 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली अमली पदार्थविरोधी शपथ|Marathi News.

News@Drugs...

Chandrapur : अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून युवक व विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाच्या वतीने ‘नशामुक्त युवा भारत अभियान’ अंतर्गत जिल्हाभरात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली.या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तब्बल २०३ शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘Say No to Drugs’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे सेवन न करण्याची तसेच नशामुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घेण्याची सामूहिक शपथ घेतली.

'प्रमुख मान्यवरांची उपस्थिती.'

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर :

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा शपथविधी पार पडला.

शिवाजी हायस्कूल राजुरा :

राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी अमली पदार्थविरोधी शपथ घेतली.

बी.जे.एम.कार्मेल अकॅडमी चंद्रपूर :

जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे घातक दुष्परिणाम समजावून सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांना नशेपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली.

खत्री कॉलेज चंद्रपूर :

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी अमली पदार्थविरोधी शपथ घेतली.

'नशामुक्त समाजनिर्मितीचा संकल्प.'

विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेविरोधात जागरूकता निर्माण करणे, त्यांना अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवणे आणि निरोगी व सुरक्षित पिढी घडविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

यामोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी पोलीस अंमलदार,मुख्याध्यापक,शिक्षक,स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे या अभियानाला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले.

‘नशामुक्त युवा,सशक्त भारत’ या संकल्पनेवर विश्वास व्यक्त करत विद्यार्थ्यांनी स्वतः अमली पदार्थांपासून दूर राहण्यासोबतच आपल्या मित्रपरिवारात आणि समाजातही नशाविरोधी जनजागृती करण्याचा निर्धार केला.

चंद्रपूर पोलीस दलाच्या वतीने युवक व विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी भविष्यातही विविध जनजागृती,शपथविधी आणि प्रतिबंधात्मक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

#Drug-Free Youth India Campaign. #Say No to Drugs. #Chandrapur Police.

                          ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢