District-Level Gathering of the Rural Journalists Union : ग्रामीण पत्रकारिता लोकशाहीचा दीपस्तंभ; पत्रकारांनी सत्य,तथ्य,जनहिताला प्राधान्य द्यावे. — आ. सुधीर मुनगंटीवार | Marathi News.

News@Rural Journalists....

         Chandpur : लोकशाहीच्या बळकटीकरणात पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.पत्रकार हा केवळ लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ नसून समाजाला योग्य दिशा दाखविणारा ‘दीपस्तंभ’ आहे.ग्रामीण भागातील पत्रकार हा शासन,प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून गावपातळीवरील घटना,समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षा मुख्य प्रवाहातील माध्यमांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो,असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.ते १६ ऑगस्ट २०२६ रोजी चंद्रपूर येथे आयोजित ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघा’च्या जिल्हास्तरीय मेळाव्यात बोलत होते.यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे,मटाचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव राजेश डांगटे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन,जिल्हा कार्याध्यक्ष पि.एम.सहानी इतरांची मंचावर उपस्थिती होती.मुनगंटीवार म्हणाले की,आजच्या डिजिटल युगात बातमी प्रसारित करण्याचा वेग प्रचंड वाढला आहे.मात्र,वेगापेक्षा बातमीची विश्वसनीयता,अचूकता आणि सत्यता अधिक महत्त्वाची आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे प्रत्येक व्यक्तीला माहिती प्रसारित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी आणखी वाढली आहे.अपुरी माहिती, अफवा किंवा अप्रमाणित संदेशांना बातमीचे स्वरूप न देता तथ्यांची पडताळणी करूनच वृत्त प्रसिद्ध करणे आवश्यक आहे पत्रकारितेने समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करावे,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.ग्रामीण पत्रकारांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज :

ग्रामीण पत्रकारांना प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.मर्यादित साधने,प्रवासाचा खर्च,बातमी संकलनासाठी लागणारा वेळ,तांत्रिक सुविधा, डिजिटल माध्यमांचे वाढते आव्हान आणि आर्थिक अस्थिरता या बाबींचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण पत्रकारिता अनेकदा अधिक आव्हानात्मक असते दुर्गम गावातील नागरिकांची समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांना प्रत्यक्ष घटनास्थळी जावे लागते.

पारंपरिक वृत्तपत्रांपासून डिजिटल न्यूज पोर्टल,सोशल मीडिया, यूट्यूब आणि मोबाईल पत्रकारितेपर्यंत माध्यमविश्वात मोठा बदल झाला आहे.मात्र,तंत्रज्ञान बदलले तरी पत्रकारितेची मूलभूत मूल्ये बदलता कामा नयेत.सत्य,तथ्य,जनहित,निष्पक्षता,जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी ही पत्रकारितेची कायमस्वरूपी मूल्ये असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

ग्रामीण पत्रकारांना एकत्र आणणे,त्यांच्या अडचणी शासन व प्रशासनासमोर मांडणे,पत्रकारिता क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे तसेच पत्रकारांच्या व्यावसायिक आणि सामाजिक हितासाठी प्रयत्न करणे,यासाठी पत्रकार संघटनांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

पत्रकारिता,सामाजिक बांधिलकी आणि माध्यमांच्या जबाबदारीवर मंथन :

जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न,पत्रकारितेतील बदलते प्रवाह सामाजिक बांधिलकी तसेच लोकशाही व्यवस्थेत माध्यमांची जबाबदारी,या विविध विषयांवर मेळाव्यात सखोल चर्चा झाली.यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्ह्यातील श्रेष्ठ व ज्येष्ठ पत्रकार,ग्रामीण भागातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान व गौरव करण्यात आला.

ग्रामीण पत्रकारितेच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच बदलत्या माध्यमविश्वात पत्रकारांनी आपली विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी कायम राखावी,असा संदेश या जिल्हास्तरीय मेळाव्यातून देण्यात आला.सदर मेळाव्याच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा टीमने अथक परिश्रम घेतले.जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.#Rural Journalists Association Holds District-Level Meet. #District-Level Gathering of the Rural Journalists Union. #MLA Sudhir Mungantiwar.

                               ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢