Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा (LCB),चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताज स्क्रॅप(Taj Scrap),येथे कारवाई करून चोरी करून आणल्याचा संशय असलेला तब्बल ₹1 लाख 32 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपासासाठी त्याला दुर्गापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी LCB पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ताज स्क्रॅप येथे छापा टाकण्यात आला.यावेळी ॲल्युमिनियम तार,लोखंडी सलाखी,इलेक्ट्रिक पोल तसेच डी.पी.चे लोखंडी साहित्य असा मुद्देमाल आढळून आला.
या प्रकरणी प्रमोद रामलाल सूर्यवंशी (वय 47,रा.नेरी,दुर्गापूर), याला संशयित मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील तपासकामी दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
जप्त मुद्देमाल :
• लोखंडी सलाखी – ₹1,02,300.
• ॲल्युमिनियम तार – ₹12,750.
• लोखंडी पोल – ₹8,800.
• डी.पी.चे लोखंडी साहित्य – ₹8,000.
• एकूण – ₹1,32,250.
याप्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून,पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात उपविभाग मूल, चंद्रपूर शहर पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकाने केली आहे.
#Crime News.#Action by LCB Chandrapur. #Taj Scrap.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
