Chandrapur Crime : वरोऱ्यात घरातून पिस्टल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल,दाम्पत्याचा शोध सुरू | Marathi News.

News@Crime...

Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन वरोरा, यांच्या संयुक्त पथकाने वरोरा शहरातील मित्र चौक परिसरात कारवाई करत एका इसमाच्या घरातून विनापरवाना पिस्टल व मॅग्झीन,असा सुमारे 50 हजार रुपये किमतीचा अग्निशस्त्रसाठा जप्त केला.याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अग्निशस्त्र पुरविणाऱ्या दाम्पत्याचा शोध सुरू आहे.

दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलीस स्टेशन वरोरा,येथील गुन्हे शोध पथक वरोरा शहरात पेट्रोलिंग करीत असताना,मित्र चौक,वरोरा येथील संतोष सेलोकार,याने आपल्या राहत्या घरी विनापरवाना अग्निशस्त्र बाळगून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संतोष दादाजी सेलोकार(वय 48 वर्षे),याच्या राहत्या घरी छापा टाकून घराची झडती घेतली.यावेळी घरातून एक पिस्टल व मॅग्झीन,किंमत अंदाजे 50 हजार रुपये,असा मुद्देमाल विनापरवाना मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला.

पोलिसांनी अग्निशस्त्राबाबत आरोपीकडे चौकशी केली असता, मित्र चौक वरोरा,येथील त्याचा नातेवाईक देवा नौकरकार व त्याची पत्नी भाग्यश्री देवा नौकरकार,यांनी त्यांच्या घरी सदर अग्निशस्त्र आणून दिल्याचे आरोपीने सांगितले.

या प्रकरणी संतोष सेलोकारला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन वरोरा येथे आणण्यात आले.त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 904/ 2026,कलम 3 व 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान,पाहिजे आरोपी देवा नौकरकार व त्यांची पत्नी भाग्यश्री नौकरकार यांचा शोध सुरू असून,या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

'वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.' :

 सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे,लक्ष्मी चौधरी,पोउपनि.सर्वेश बेलसरे,तसेच पोहवा.सुभाष गोहोकार,सचिन गुरनुले,रजनिकांत पुट्टावार,सुखराज यादव, अमोल नवघरे,पोअं.विठ्ठल काकडे,प्रफुल्ल पुप्पलवार,प्रतिक हेमके,महेश गावतुरे,सौरभ कुलथे,मपोअं.पुजा मोहुर्ले,दिपाली देशमुख,चापोहवा.दिनेश अराडे व प्रशांत बावणे यांचा सहभाग होता.

#Chandrapur District Crime News. #Chandrapur Police 

                           €€€€€€€€€€€€€€€€€€€€€