Chandrapur : जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांची तस्करी,विक्री तसेच बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा (LCB)ने गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी करून अवैध अग्निशस्त्रांची वाहतूक करणाऱ्या 3 संशयितांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत 2 पिस्तुल सदृश लोखंडी अग्निशस्त्रे,2 मॅगझिन,13 जिवंत काडतुसे,3 मोबाइल फोन आणि Tata Zest कार,असा सुमारे 6 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी :
21ऑगस्ट 2026 रोजी LCBचे पथक अवैध शस्त्रे,जुगार तसेच इतर बेकायदेशीर कारवायांविरुद्ध कारवाईसाठी रवाना झाले होते.यावेळी नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाच्या Tata Zest कारमधून काही व्यक्ती अग्निशस्त्रे घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे 22 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास पडोली चौक परिसरात नाकाबंदी करण्यात आली.यावेळी नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने येणारी Tata Zest कार क्रमांक MH/14/GD/ 0708 पोलिसांच्या निदर्शनास आली.वाहन थांबवून त्यातील व्यक्तींची चौकशी केली असता त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या.त्यानंतर पंचांसमक्ष वाहनातील व्यक्तींची झडती घेण्यात आली.या झडतीदरम्यान वरील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बिहारमधून शस्त्रे आणल्याचा प्राथमिक संशय :
प्राथमिक चौकशीत ही अग्निशस्त्रे बिहार राज्यातून आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.नागपूर येथे पोहोचल्यानंतर ऑनलाइन वाहन बुक करून ही शस्त्रे चंद्रपूर येथे विक्री करण्याच्या उद्देशाने आणण्यात आल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन पडोली येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपासासाठी तिन्ही संशयितांना पडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.शस्त्र तस्करीच्या प्रकरणा मागे आणखी कोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे,अवैध शस्त्रांचा पुरवठा नेमका कोणत्या माध्यमातून केला जात होता तसेच या नेटवर्कची व्याप्ती किती? याचा तपास पोलीस करीत आहेत.
ताब्यात घेतलेले आरोपी :
1) दुर्गेशकुमार सुधीर मिश्रा (26),रा.गोपालपुर,ता.केवटी,जि. दरभंगा,बिहार.
2) रविकुमार राजकुमार पासवान (19),रा.पिंडारून,ता.केवटी, जि.दरभंगा,बिहार.
3) सुनीलकुमार विजय साहानी (20),रा.गोपालपुर,ता.केवटी, जि.दरभंगा,बिहार.
LCBच्या पथकाची कामगिरी :
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.दिपक कॉक्रेडवार,पोउपनि.पोउपनि.विनोद भुरले, पोउपनि.सर्वेश बेलसरे,पोउपनि.सुनिल गौरकार,पोहवा.सतिश अवथरे,पोहवा.लालु यादव,पोहवा.इम्रान खान,पोहवा.हिरालाल गुप्ता,पोहवा.संदिप कांबडी,पोहवा.शरद कुडे,पोहवा.अजय बागेसर,पोहवा.गणेश भोयर पोहवा.रामा बिंगेवार,पोअं.शशांक बदामवार,पोअं.किशोर वाकाटे,पोअं.शेखर माथनकर,चापोअं. वृषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपुर तसेच पोहवा. कार्तीक खनके,पोअं.गुणंवत,पोअं.अनिमेश पोस्टे सायबर सेल, चंद्रपुर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
मोहीम अधिक तीव्र' होणार :
चंद्रपूर पोलिसांकडून अवैध शस्त्रे,शस्त्रांची तस्करी व बेकायदेशीर शस्त्र विक्रीविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल,असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
#Chandpur Crime News. #Action by LCB Chandrapur.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
